सिंधुदुर्गनगरी : गोवा राज्यातील मतदार असलेले परंतु महाराष्ट्रात काम करणार्या नागरिकांना मतदानासाठी दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारची महामंडळे, अंगीकृत उपक्रम, निमशासकीय कर्मचारी यामध्ये कार्यरत सर्वांना सुट्टी लागू राहिल. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे,अशी माहिती अपर मुख्य सचिव डॉ. भगवान सहाय यांनी दिली आहे.