मुबंई : गणेशोत्सवापूर्वी मुंबई–गोवा महामार्गावरील खडडे बुजविण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे–पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य प्रशांत ठाकूर, अतुल भातखळकर यांनी याबाबतीत प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या उपप्रश्नाला उत्तर देताना पोटे–पाटील यांनी ही माहिती दिली. मुंबई–पनवेल महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खासगीकरणांतर्गत करण्यात आले असून संबंधित कंत्राटदाराला 21/9/2016 रोजी नोटीस देण्यात आली आहे. बी ओटी तत्वावर काम असल्याने 17 वर्षासाठीचा या महामार्गासाठीचा देखभाल दुरूस्तीचा कालावधी आहे. सवलत कालावधीमध्ये देखभाल व दुरूस्ती तसेच सुशोभिकरणाची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. या संदर्भात उदयोजकांच्या जबाबदारीने व खर्चाने विभागामार्फत दुरूस्ती करण्यात आली आहे.