रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील गिमवी माळरानाराला आज भीषण आग लागली. या आगीत लाखो रूपयांची आंबा आणि काजुची कलमे जळून खाक झाली. गुहागर तालुक्यातील गिमवी, देवघर माळरानाला ही भीषण आग लागली. आग लागली त्याचवेळी वा-याने आपली दिशा बदलली आणि त्यामुळे आगीच्या ज्वाळा आणखीन वाढल्या. विशेष म्हणजे या माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत येतं, त्यामुळे आग आणखीन भडकली. याच माळरानावर काही शेतक-यांनी आंबा आणि काजूच्या बागा देखील केल्यात मात्र लागलेल्या आगीमध्ये या बागा जळून खाक झाल्या आहेत. आग कशी लागली याचा देखील शोध स्थानिक ग्रामस्थांकडून घेण्यात येतोय.