घाटकोपर : घाटकोपर मेट्रो रेल्वे स्थानकाखाली पदपथावर कब्जा करणार्या फेरिवाल्यांनी तेथून चालणार्या एका विद्यार्थ्यांचा धक्का लागला म्हणून त्याला बेदम मारहाण केली. शुक्रवारी हा प्रकार घडला. जखमी विद्यार्थ्याचे नाव निलेश येवले(२०) असे आहे. मारहाणीत जखमी झालेल्या निलेशला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. इंद्रेशकुमार गुप्ता (२०) याच्याह तीन फेरिवाल्यांवर अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
निलेश हा घाटकोपर रेल्वे स्थानकाकडून घराकडे जात होता. याचवेळी मेट्रो स्थानकाखाली इंद्रेशकुमार या फेरिवाल्याला त्याचा धक्का लागला. धक्का लागताच इंद्रेशकुमारने निलेशला शिविगाळ केली. तसेच अनेक फेरिवाले तेथे जमा झाले आणि निलेशला मारहाण करण्यास सुरुवात केली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना ही बाब समजली आणि त्यांनी विरोध करताच इतर फेरिवाले पळून गेले. त्या ठिकाणी आलेल्या पोलसांच्या हाती इंद्रेशकुमार लागला.