मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) : शिवाजी स्पोर्ट्स क्लब घाटकोपर पश्चिम या संस्थेच्यावतीने भारताचा ७५ वा अमृत मोहोत्सव स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती रमेश भाऊ सोनवणे, डॉ. कल्पेश सोळंकी, डोंगरे सर,ऍड.मीनाताई भालेराव, सौ. श्रद्धा ताई मांडवकर यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
इयत्ता १ ली ते पदवीधर विद्यार्थी वर्गाला मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. विद्यार्थांनी देश भक्ती गीत सादर केले.कु गौरव निगवले व ईश्वरी चरकरे, सह विद्यार्थी यांनी वेशभूषा परिधान करून देशभक्ती जागृत केली.तसेच स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून भिम नगर विभागातील नागरिकांना मोफत नेत्र चिकित्सा शिबीर आयोजित करसण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून अपघाती रु. ३९९/रुपयांमध्ये विमा योजना राबविण्यात आली.विभागातील जनतेने याचा लाभ घेतला. विभागामध्ये लाडू वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. सर्व कार्यक्रम राबविण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक सुरेश चरकरे,मंडळाचे अध्यक्ष शरद भावे,सरचिटणीस प्रमोद बोले,खजिनदार सखाराम गोताड युवक कार्यकते व सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.