घाटकोपर ता १०, आषाढी एकादशी निम्मित घाटकोपर मधील नागरिकांनी तयार केलेल्या घाटकोपर प्रगती मंच या व्हाट्सअप ग्रुप तर्फ़े आषाढी एकादशी उत्सव, घाटकोपर च्या जांभळीपाडा येथे रविवार दि १० रोजी पार पडला.या ठिकाणी भव्य देखाव्या सह विठ्ठल दर्शन आणी पूजेची व्यवस्था करण्यात आली होती.याच बरोबर सर्व भाविकांना उपवासाची खिचडी, केळी आणि तुळशी रोपाचे वाटप करण्यात आले.या उत्सवाला सात हजार पेक्षा जास्त भाविकांनी भेट देऊन फराळाचा आस्वाद घेतला.घाटकोपर मधील विविध समस्यांवर आवाज उचलण्यासाठी, विविध सामाजिक उपक्रम साजरे करण्यासाठी हा ग्रुप २०१४ सालापासून कार्य करतो आहे.
घाटकोपर मध्ये मोठ्या प्रमाणत वारकरी आणि कष्टकरी जनता आहे.त्यामुळे आषाढी एकादशी ला उपवास असणाऱ्या प्रत्येक विठ्ठल भक्ताला सकाळी उपवासाचा आहार मिळावा, त्याला विठ्ठल दर्शन करता यावे, तसेच तुळस रोप चे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व नागरिकांना कळावे म्हणून याचे मोफत वाटप केले जाते.गेले सहा वर्षे हा उपक्रम मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.यंदाच्या वर्षी देखील या ठिकानी पारंपरिक वेशभूषा करून, तसेच विठ्ठल , रुख्मिनी आणि वारकऱ्यांचा पोशाख घालून अभ्युदय विद्यालय मधील विद्यार्थ्यांची दिंडी आली होती.तिचे स्वागत जल्लोषात मंच तर्फे करण्यात आले.तसेच विश्वनाथ संगीत विद्यालय मधील विद्यार्थ्यांनी संगीत भजन सादर करून या कार्यक्रमात आणखी रंग भरला.या कार्यक्रमाला प्रसिद्ध डॉक्टर वैभव देवगिरीकर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली, समाजसेवक राजू पाखरे, माजी नगरसेवक दीपक हांडे, किरण लांडगे, वैभव आवटे पाटील , घाटकोपर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके, पोलीस निरीक्षक प्रमोद कोकाटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या उत्सवाची सांगता भव्य महाआरती ने करण्यात आली यात ग्रुप मधील सर्व सदस्यांनी सहभाग घेतला.