मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर इमारत दुर्घटेतील बळींची संख्या १७ वर पोहचली आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर बांधकाम सुरू होते. त्यासाठी काही पिलर्स तोडून त्या जागी टेकू म्हणून लोखंडी चॅनल लावण्यात आले होते. टेकूंमुळे दुर्घटना घडली. तळमाळ्यावरील सर्व भिंतीं तोडण्यात आल्या होत्या, अशी माहिती रहिवाशांनी दिली. आज बुधवारी ढिगारा उपसत असताना लोखंडी रॉड आढळून आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील शितप याला आज दुपारी विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात आले. शितपला दोन ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आम्ही आठ ते दहा वर्षांनी इमारतीची दुरुस्ती करत होतो, त्यामुळे तिची स्थिती चांगली होती, अशी माहिती ३४ वर्षांपासून इमारतीत राहत असलेले लालचंद रामचंदानी यांनी दिली. महापालिकेने कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नव्हती. शितपने कोणतिही परवानगी न घेता इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. शितपवर पार्क साईट पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतांची नावे
रंजनबेन शहा (६२)
सुलक्षणा खनचंदानी (८०)
रेणुका ठक (३ महिने)
मनसुखभाई गज्जर (७५)
अमृता ठक (३१)
पंढरीनाथ डोंगरे (७५)
दिव्या पारस अजमेरा (४८)
मिकुल खनचंदानी (२२)
ऋत्वी प्रितेश शहा (१४)
किशोर खनचंदानी (५०)
मनोरमा डोंगरे (७०)
क्रीषु डोंगरे (१३ महिने)
प्रमिला ढग (५६)
तिराली अजमेरा (२४)
बिना देवरा (४६)
समुद्रा देवरा (७७)
विजय देवरा (५२)