मुंबई, (निसार अली) : भाकर फाऊंडेशन मुंबई, टीआयएसएस ,महानगर पालिका, निर्मला निकेतन समाजकार्य महाविद्यालय यांचा संयुक्त विद्यमाने गोरेगाव येथे अनेक असंघटित महिला कामगारांना व गरजू महिला मुलींनी घरपोच 2400 सेनिटेरी पॅडचे मोफत वाटप करण्यात आले.
सॅनिटेरी पॅड घ्यायला महिला मुलीं लाजतात, असे अनेक वेळा बोलले जाते. पण मी स्वत: या मुलींनी सोबत सॅनिटेरी पॅड पॅकिंग व वाटप करायला गेलो होतो. एकाही महिला, मुलींना लाजताना पाहिले नाही. खूप आनंदाने सर्वांसमोर सॅनिटेरी पॅड घेत होत्या. या गोष्टींतून जाणवत आहे की, समाजाची मानसिकता बदलत आहे आणि माझा बदल प्रक्रियेवर अधीक विश्वास वाढत आहे असे मत दिपक सोनावणे यांनी व्यक्त केले. पैड वाटप करण्यासाठी स्वयंसेवक सरीता पोटे, रुबिना पठाण, आरती डोईफोडे, धनश्री नाई, पुजा देवाडे, जमिला शेख,व इतरांनी महत्वपूर्ण सहकार्य केले.