मुंबई : हवामान आणि शेतीविषयक माहिती देण्यार्या स्कायमेट य़ा भारतातील अग्रगण्य कंपनीने मोबाइलकरीता असणार्या अॅपची नवीन आणि अद्ययावत आवृत्ती प्रकाशित केली आहे. यामुळे मुंबईतील नागरिक तसेच प्रवाशी यांना त्यांच्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. शेतकऱ्यांना नियमित पीकविषयक सल्ला देखील अॅपवर घेता येणार आहे. Google Play आणि Apple अॅप स्टोअरवर हे अॅप उपलब्ध असून, सुमारे पन्नास हजार जणांनी ते डाउनलोड केले आहे. यामुळे बोरीवली, कांदिवली, मालड, गोरेगाव, मुलुंड, बांद्रा, जोगेश्वरी, अंधेरी इत्यादीसह मुंबईतील तब्बल १६ प्रमुख ठिकाणांच्या हवामानाबद्दलची परिपूर्ण माहिती मिळते. फक्त मुंबईकरिताच नाही तर हे अॅप देशभरात सुमारे ६५०० पेक्षा अधिक स्थानकांसाठी आणि जगभरातील २ लाखांपेक्षा अधिक ठिकाणांसाठी हवामानाचा अंदाज व्यक्त करते.
मान्सून हा मुंबईसाठी अतिशय महत्वाचा भाग आहे. मुंबईतील वाहतूक व्यवस्था, रहदारीतील अडथळे आणि मान्सूनच्या पावसापासून बचाव करण्यासाठी सामान्य नागरिक या अॅपद्वारे त्यांच्या दैनंदिनीचे चांगल्या प्रकारे नियोजन करू शकतात. (Live) इशारा, वेळेवर आणि अचूक अंदाज, हवामान विषयक व्हिडिओ, हवामानाबद्दल इशारा आणि दर अर्ध्या तासाला उपग्रह प्रतिमा अॅपवर दिली जाते. हे अॅप जीवनशैली, संस्कृती, अन्न, क्रीडा आणि प्रवासासंबंधित माहिती पुरवते. तइंग्रजी भाषेशिवाय मराठी आणि गुजरातीसह प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध आहे. आता मुंबईकर स्कायमेटच्या हवामान अॅपवर सद्य स्थितीत येणाऱ्या मुसळधार पावसाबद्दल माहिती मिळवू शकता तसेच कुठे वीज कोसळू शकते याबद्दल आढावा घेऊ शकतात. स्कायमेटने थेट आणि अचूक अंदाजासाठी तसेच मान्सूनच्या पावसाचा मागोवा घेण्यासाठी मुंबई शहरात सुमारे १०० स्वयंचलित हवामान केंद्र उभारली आहेत.
स्कायमेटचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह म्हणतात, “भारतातील पहिली खाजगी हवामान कंपनी म्हणून आम्हाला असे वाटते की, २६ जुलै २००५ रोजी मुंबईत फक्त दोन तासांत झालेल्या ९०० मिमी पावसाचे उदाहरण लक्षात घेता विद्यमान तंत्रज्ञानदेखील फोल ठरते. स्कायमेट एक दशकाहून अधिक काळ या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करीत आहे आणि मुंबईकरांना शहरात अतिवृष्टी आणि पूर येण्याच्या शक्यतेची १०-दिवस आधी माहिती देण्याची कल्पना आहे. हवामानविषयक अंदाज एक नवीन विषय असून जटिल विज्ञान आहे आणि म्हणूनच हे अॅप निश्चितच लोकांचे जीवन सोपे करेल. ”
लोकप्रिय वैशिष्ट्ये:
• आपण मेट्रो सिटीमध्ये किंवा दुर्गम गावात राहत असला तरीही आपल्या स्थानासाठी दर तासाला, दररोज, साप्ताहिक आणि विस्तारित अंदाज तसेच वर्तमान हवामान स्थितीविषयक माहिती मिळते.
• आपल्या घरातील आणि आवडत्या शहरासाठी हवामान विषयक इशारे आणि अधिसूचना मिळतात/
• ५ आवडती ठिकाणे संग्रह करणे शक्य
• पाऊस, तापमान, आर्द्रता आणि वारा यासह संपूर्ण देशभरातील थेट वीज आणि गडगडाटी स्थितीची माहिती उपलब्ध.
• दर अर्ध्या तासाला भारतातील हवामानाची स्थिती दर्शविणारी उपग्रह प्रतिमा
• इन्सॅट आणि मेटीओसॅट उपग्रह प्रतिमा
• दैनंदिन हवामान व्हिडिओ, हवामान बातम्या आणि विश्लेषण, हवामान बदल, पृथ्वी आणि निसर्ग, हवामान गॅलरी, हवामान विषयक सामान्य प्रश्न, शेती आणि अर्थव्यवस्था आणि बहुभाषी सामग्रीसह विशिष्ट आणि तपशीलवार हवामान विषयक माहिती
डाउनलोड करण्यासाठी – निवडा आणि क्लिक करा
• Google Play store – https://play.google.com/store/apps/details?id=com.skymet.indianweather
• ऍपल ऍप स्टोअर –https://apps.apple.com/in/app/skymet-weather/id1112571812