Mumbai : श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, यांनी दि. ५.१.२०२२ रोजी वाडीबंदर कोचिंग डेपोची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी पिट लाइनवर सुधारित ऑनलाइन रेक टेस्ट रिगची तपासणी केली, ज्यामुळे वाडीबंदर कोचिंग डेपोमध्ये एअर ब्रेक चाचणी दरम्यान मनुष्यबळाची गरज कमी होण्यास मदत होईल.
महाव्यवस्थापकांनी सीक लाइन आणि बेसिक ट्रेनिंग सेंटर, फायर सप्रेशन सिस्टीम सारखी अग्निसुरक्षा उपकरणे, विदर्भ एक्स्प्रेसमध्ये सेवेत लावलेला प्रथम वातानुकूलित कोच, ज्याला बाहेरील बाजूस वारली पेंटिंग, सोलर पॉवर सिस्टम प्रेशराइज्ड फ्लशिंग सिस्टीम, एलईडी पेंटिंग आणि प्रत्येक क्यूबिकलच्या आतील हस्त चित्रांचीही पाहणी केली. त्यांनी केलेल्या सुरक्षितता परीक्षांचेही निरीक्षण केले आणि विविध अपयशांचे विश्लेषण आणि केलेल्या सुधारात्मक कारवाईवर चर्चा करण्यात आली.
श्री अनिल कुमार लाहोटी यांनी डब्ल्यूएसपी (वुमन सेल्फ पॉवर) टोळीला देखील भेट दिली जी एलएचबी कोचच्या व्हील स्लाइड प्रोटेक्शन सिस्टीमची देखरेख करत आहेत. पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक अयशस्वी घटक, कारणे आणि सुधारात्मक कृतींबद्दल सीक लाइनची तपशीलवार चर्चा केली गेली.
प्रेशराइज्ड फ्लशिंग, टाईल्ड फ्लोअरिंग आणि विनाइल रॅप्ड इंटीरियर्सचा समावेश असलेल्या सुधारित शौचालयांसह अपग्रेड केलेल्या उत्कृष्ट कोचची तपासणी करण्यात आली. मुंबई विभागाने हाती घेतलेले विविध आयटी उपक्रम आणि नवनवीन उपक्रमांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाव्यवस्थापकांनी रोलिंग इन आणि रोलिंग आउट ट्रेन्सची सुरक्षा तपासणी आणि त्यानंतर वृक्षारोपण याविषयी एक पुस्तिका जारी केली.
श्री ए के गुप्ता, प्रधान मुख्य यांत्रिक अभियंता, श्री विवेक दीक्षित, मुख्य विद्युत अभियंता (रोलिंग स्टॉक), श्री शील भद्र, मुख्य विद्युत अभियंता (कोचिंग) मुख्यालय आणि श्री आशुतोष गुप्ता, एडीआरएम (इन्फ्रा), श्री सुदीप प्रसाद, वरिष्ठ विभागीय मेकॅनिकल इंजिनीअर (कोचिंग) आणि मध्य रेल्वे मुंबई विभागचे वरिष्ठ अधिकारी तपासणीवेळी उपस्थित होते. तपासणीदरम्यान कोविड-१९ साठी अनिवार्य असलेले सर्व नियम पाळण्यात आले














