रत्नागिरी :- शासनाच्या महसुल व वनविभाग यांचेकडील 01 सप्टेंबर 2022 रोजीच्या पत्रान्वये राज्यात गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, 2013 राज्यात लागू करण्यात आला आहे. सदर नियमामधील तरतुदीनुसार गौण खनिजाचा खाणपटा/ नुतनीकरणाच्या मंजूरीबाबत तसेच अल्पमुदतीचे तथा तात्पुरत्या स्वरूपाचे गौण खनिज उत्खनन परवाने देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.
गौणखनिजाचे उत्खनन व वाहतुकीचे संनियंत्रण व देखरेख करण्यासाठी “महाखनिज” ही संगणक प्रणाली लागु करण्यात आली आहे. सदर प्रणालीमध्ये खाणपटा मंजूरीबाबत / खाणपट्ट्याच्या नुतनीकरण तसेच अल्पमुदतीचे तथा तात्पुरत्या स्वरुपाचे गौणखनिज उत्खनन परवान्यबाबतचे अर्ज ऑनलाईन स्विकारण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी 01 ऑक्टोबर 2022 पासून खाणपटा मंजूरीबाबत / खाणपटयाच्या नुतनीकरण तसेच अल्पमुदतीचे/तात्पुरत्या स्वरुपाचे गौणखनिज उत्खनन परवान्याबाबतचे अर्ज हे अर्जदार यांच्याकडून “महाखनिज” http://mahakhanij.maharashtra.gov.in या संगणक प्रणालीवर ऑनलाईन स्विकारण्यात येणार आहेत, असे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी कळविले आहे.