
डोंबिवली,(प्रशांत जोशी) : डोंबिवली पश्चिमेतील गायकवाड वाडी परिसरात पारसनाथ इमारतीत मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घरातील गँस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत तिघे जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात दाखल करून घेतले होते. शिंदे गटाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींच्या तब्बेची चौकशी केली. म्हात्रे यांनी जखमींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली.
डोंबिवली पश्चिमेतील गायकवाडवाडी परिसरात पारसनाथ ही इमारत आहे. तळ मजल्यावर मनिषा मोरवेकर या राहतात. मंगळवारी रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात अचानाक स्फोट झाला. स्फोट इतका भयानक होता की, घराचे दोन्ही दरवाजे उडाले. मनिषा या जखमी झाल्या. याचवेळी जिन्यावरुन वरती जाताना उर्वशीला लोढिया आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा रियांश हा देखाल जखमी झाला.
घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले. जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिलिंडरचा पाईप लिकेज असल्याने हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. यावेळी शिंदे गटाचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जखमीच्या उपचाराची जबाबदारी उचलल्याचे सांगितले















