मुंबई : गरवारे-वॉल रोप्स लि. (जीडब्लूआरएल) या टेक्निकल टेक्स्टाइल्स क्षेत्रातील एका आघाडीच्या कंपनीने आर्थिक वर्ष 15-16 व आर्थिक वर्ष 16-17 मध्ये फिश नेटिंग निर्यात श्रेणी व रोप्स श्रेणी यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल, प्लास्टिक्स एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलने (PLEXCONCIL) मुंबईतील द लीला येथे नुकत्याच झालेल्या समारंभात कंपनीला प्रतिष्ठेच्या ‘टॉप एक्स्पोर्टर’ पुरस्काराने गौरवले आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने प्रायोजित केलेले प्लास्टिक्स एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल भारतातील प्लास्टिक्स उद्योगातील निर्यातकांचे प्रतिनिधीत्व करते आणि सर्व श्रेणींतील उल्लेखनीय निर्यातकांचा गौरव करते.
गरवारे-वॉल रोप्स लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शुजौल रेहमान यांनी सांगितले, “PLEXCONCIL ने आमची दखल घेणे व आमचा पुरस्काराने गौरव करणे, हा आमचा सन्मान आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने, आमच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवांद्वारे ग्राहकांना जास्तीत जास्त मूल्य देण्यासाठी आम्ही सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांना पावती मिळाली आहे.”
PLEXCONCIL निर्यातविषयक निरनिराळे उपक्रम अवलंबते, जसे आंतरराष्ट्रीय ट्रेड फेअरमध्ये सहभाग; बाजारपेठांसंबंधी शिष्टमंडळाला प्रायोजकत्व देणे; परदेशी शिष्टमंडळाला भारतात आमंत्रित करणे; भारतात व परदेशात ग्राहक-विक्रेते यांच्या परिषदा आयोजित करणे आणि आपल्या सदस्यांच्या गरजा पूर्ण करणे, आदी कार्य पार पाडले जातात.
गरवारे वॉल रोप्स लि.विषयी :
गरवारे-वॉल रोप्स लि. (जीडब्लूआरएल) ही आयएसओ 9001:2015 प्रमाणित कंपनी टेक्निकल टेक्स्टाइलमधील आघाडीची कंपनी असून, ती जगभरातील ग्राहकांना कस्टमाइज्ड सेवा देते. जगभर कंपनी क्रीडा, फिशरीज, अॅक्वाकल्चर, शिपिंग, कृषीस कोटेड फॅब्रिक्स व जिओसिंथेटिक्स या क्षेत्रांतील नावीन्यासाठी प्रसिद्ध आहे. जीडब्लूआरएल उत्पादनांची निर्मिती वाई व पुणे येथील अद्ययावत प्रकल्पांमध्ये केली जाते आणि जगभरातील 75 हून अधिक देशांमध्ये विक्री केली जाते.