मुंबई : गरवारे टेक्निकल फायबर्स लि. (अगोदरची गरवारे-वॉल रोप्स लि.) या भारतीय व जागतिक बाजारांसाठी टेक्निकल टेक्स्टाइलची निर्मिती करणाऱ्या आघाडीच्या उत्पादकाने सप्टेंबर 30, 2018 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीतील व पहिल्या अर्धवर्षातील आर्थिक निकाल आज जाहीर केले.
आर्थिक वर्ष 19 मधील दुसऱ्या तिमाहीतील ठळक वैशिष्ट्ये:
- आर्थिक वर्ष 19 मधील दुसऱ्या तिमाहीत, निव्वळ विक्रीमध्ये 27.1% म्हणजे 262 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली, तर आर्थिक वर्ष 18 मधील दुसऱ्या तिमाहीत हे प्रमाण 206 कोटी रुपये होते
- आर्थिक वर्ष 19 मधील दुसऱ्या तिमाहीत, करपूर्व नफ्यामध्ये 17.4% म्हणजे 48.7 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली, तर आर्थिक वर्ष 18 मधील दुसऱ्या तिमाहीत हे प्रमाण 41.5 कोटी रुपये होते
- आर्थिक वर्ष 19 मधील दुसऱ्या तिमाहीत, निव्वळ नफ्यामध्ये 17% म्हणजे 32.9 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली, तर आर्थिक वर्ष 18 मधील दुसऱ्या तिमाहीत हे प्रमाण 28.2 कोटी रुपये होते
- आर्थिक वर्ष 19 मधील दुसऱ्या तिमाहीत, प्रति शेअर उत्पन्न 15.05 रुपये होते, आर्थिक वर्ष 18 मधील दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ते 17% वाढले
आर्थिक वर्ष 19 मधील पहिल्या सहामाहीतील ठळक वैशिष्ट्ये:
- आर्थिक वर्ष 19 मधील पहिल्या अर्धवर्षात, निव्वळ विक्रीमध्ये 12.7% म्हणजे 506.1 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली, तर आर्थिक वर्ष 18 मधील पहिल्या अर्धवर्षात हे प्रमाण 449.2 कोटी रुपये होते
- आर्थिक वर्ष 19 मधील पहिल्या अर्धवर्षात, करपूर्व नफ्यामध्ये 18.7% म्हणजे 94.8 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली, तर आर्थिक वर्ष 18 मधील पहिल्या अर्धवर्षात हे प्रमाण 79.9 कोटी रुपये होते
- आर्थिक वर्ष 19 मधील पहिल्या अर्धवर्षात, निव्वळ नफ्यामध्ये 18.8% म्हणजे 64.3 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली, तर आर्थिक वर्ष 18 मधील पहिल्या अर्धवर्षात हे प्रमाण 54.1 कोटी रुपये होते
- आर्थिक वर्ष 19 मधील पहिल्या अर्धवर्षात, प्रति शेअर उत्पन्न 29.38 रुपये होते, आर्थिक वर्ष 18 मधील पहिल्या अर्धवर्षाच्या तुलनेत 18.8% वाढले
व्यवस्थापनाची प्रतिक्रिया:
निकालाविषयी बोलताना, गरवारे टेक्निकल फायबर्स लि.चे सीएमडी वायू गरवारे यांनी सांगितले, “जिओ-सिंथेटिक्स व आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या पाठबळाने,दुसऱ्या तिमाहीत उत्पन्न व नफा या दोन्हीमध्ये समाधानकारक वाढ झाली. खनिज तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्याच्या परिणामी कच्च्या मालाचे भाव वाढल्याने या तिमाहीत महागाईची थोडी झळ बसली. यामुळे मार्जिनवर काहीसा परिणाम झाला. परंतु, आगामी महिन्यांमध्ये हा परिणाम निवळेल, असे आम्हाला वाटते.”