रत्नागिरी (आरकेजी): लग्नाचे खोटे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवत गर्भपात करण्यास भाग पाडून, तिची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखला केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीआरपी परिसरातील राहाणारी ३६ वर्षीय अविवाहित तरुणी दांडेआडम येथील ३७ वर्षीय तरुणाच्या प्रेमात पडली होती. मात्र,त्या तरुणाने तिला लग्नाचे खोटे आमीष दाखविले होते आणि त्यातूनच त्यांच्यात शारिरीक संबंध झाले होते. कोणत्याही परिस्थितीत मी तुझ्याशी लग्न करणार, अशी बतावणी करुन तो तिची वेळोवेळी फसवणूक करीत होता. सन २०१६ ते १८ मे २०१८ या कालावधीत त्याने तिची फसवणूक करुन २ लाख रुपयांचा चुना तिला लावला होता. तसेच शारिरीक संबंधातून त्या तरुणीला दिवस गेल्याने तिचा गर्भपात करुन घेतला होता. या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर त्या तरुणीने शहर पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी भा.दं.वि.क. ३७६, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय चव्हाण करीत आहेत.