
रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी शहरात गांजाचे रॅकेट गेल्या काही काळापासून वेगाने पसरत होते .याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांनी कारवाई करत गेले अनेक वर्षे बिनधोक सुरू असलेल्या या रॅकेटला धक्का दिला आहे . शहर पोलिसांच्या पथकाने गांजा प्रकरणी मोठी कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतले. अश्रफ उर्फ अडऱ्या मेहमूद शेख, दाऊद अल्लाउद्दीन होडेकर, अनिकेत किशोर ठाकूर अशी तिघांची नावं आहेत. या कारवाईत दोन किलो गांजा जप्त करण्यात आला. मंगळवारी रात्री उशीरा पोलिसांनी हि कारवाई केली. गेल्या महिन्यातच पोलिसांनी वडापच्या गाडीतून शहरात येणार गांजा साठा पकडला होता.
रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट परिसरात काही व्यक्ती गांजा घेऊन येणार असल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह शहर पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.