मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात राष्ट्र सेवा दल गोरेगाव, करणार पर्यावरण पूरक मोदकांचे वाटप करणार आहे. गेल्या काही वर्षापासून वातावरणात बदल होत आहेत. वादळ,पाऊस यांनी निसर्ग चक्र बदलताना दिसत आहे. महाराष्ट्रात कोकण, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. सह्याद्रीच्या डोंगरात दरडी आणि भूस्खलन होताना दिसत आहेत. या परिस्थितीच्या अनेक कारणांपैकी बेसुमार जंगलतोड हे ही एक कारण आहे.
राष्ट्र सेवा दलाच्या गोरेगाव विभागातर्फे यंदा पर्यावरणाला पूरक असा ‘ मातीचे मोदक घरोघरी, निसर्गाचे संरक्षण करी’ हा उपक्रम राष्ट्र सेवा दलाचे सैनिक घेऊन येत आहोत. सेवा दलाचे सैनिक हे मोदक घेवून कोकणातील पूरग्रस्त भागात जावून सह्याद्रीच्या डोंगर रांगात जावून बियाणांची लागवड करणार आहोत.
मातीमध्ये नैसर्गिकरीत्या खत आणि त्यामध्ये बी टाकून तयार केलेले मोदक घेऊन मंडळांना भेट देण्याचे योजले आहे. या पर्यावरण पूरक मोदकाची लागवड करण्याचे आवाहन राष्ट्र सेवा दल,गोरेगाव शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच या उपक्रमात जास्तीत जास्त सार्वजनिक मंडळ आणि व्यक्तींनी यात सहभागी व्हावे असे आवाहन संघटक ज्योती बामगुडे यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता संपर्क:
विशाल गोंधळी :- 70214 93806
ज्योती बामगुडे:-7045446357















