रत्नागिरी, (आरकेजी) : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने १४२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी, एलटीटी, दादर व पुणे ते करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत.
चाकरमान्यांकडून गणेशोत्सवासाठी रेल्वे, बस चे बुकिंग चार महिने अगोदरच सुरु केले जाते. गाड्यांना प्रचंड गर्दी असते. यावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे विशेष खबरदारी घेतली आहे.
विशेष गाड्या
गाडी नंबर 01187 लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी डबलडेकर ही गाडी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान प्रत्येक मंगळवारी पहाटे ५ वाजून ३३ मिनिटांनी सुटून ती रत्नागिरीला दुपारी १ वाजता पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी गाडी नंबर 01188 रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटणार असून एलटीटीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहचणार आहे.
या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, अरवली रोड, संगमेश्वर थांबा देण्यात येणार आहेत.
गाडी नंबर 01445 सीएसटी ते करमाळी ही विशेष गाडी वन वे २४ फेऱ्या करणार असून १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सुटून ती करमाळीला रात्री २ वाजून ३० मिनिटांनी पोहचणार आहे.