
रत्नागिरी : कोकणातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण असलेल्या गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून, जिल्ह्यात 1 लाख 66 हजार 986 ठिकाणी खासगी, तर 116 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भक्तिमय वातावरण आहे.

कोकणातला गणेशोत्सव हा वैविध्यपूर्ण आहे. कोकणात अगदी घराघरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. घरगुती गणेशोत्सवही सार्वजनिक गणेशोत्सवासारखा साजरा केला जातो. त्यामुळेच दरवर्षी कोकणी माणूस कितीही अडथळे आले, तरी या सणाला आपल्या गावी अगदी हमखास येतो. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, तर काही ठिकाणी 10 दिवस मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. लाखो चाकरमानी या सणासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.त्यामुळेच जिल्ह्यात सध्या भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. आज वाजतगाजत गणरायाचं घरोघरी आगमन झालं आहे.
दरम्यान रत्नागिरी शहरामध्ये 7 हजार 911 घरगुती तर 25 सार्वजनिक गणेशोत्सवांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या ग्रामीण भागात 9 हजार 964 घरगुती व केवळ एक सार्वजनिक, जयगड परिसरात 2 हजार 810 घरगुती तर 5 सार्वजनिक, संगमेश्वर 13 हजार 544 घरगुती तर 1 सार्वजनिक, राजापूर 19 हजार 900 घरगुती तर 7 सार्वजनिक, नाटे 7 हजार 279 घरगुती तर 3 सार्वजनिक, लांजा 13 हजार 540 घरगुती तर 7 सार्वजनिक, देवरूख 12 हजार 493 घरगुती तर 7 सार्वजनिक, सावर्डे 10 हजार 240 घरगुती तर 1 सार्वजनिक, चिपळूण 16 हजार 540 घरगुती तर 15 सार्वजनिक, गुहागर 14 हजार 460 घरगुती तर 2 सार्वजनिक, अलोरे 5 हजार 850 घरगुती तर 3 सार्वजनिक, खेड 13 हजार 736 घरगुती तर 20 सार्वजनिक, दापोली 6 हजार 335 घरगुती तर 9 सार्वजनिक, मंडणगड 4 हजार 439 घरगुती तर 7 सार्वजनिक, बाणकोटमध्ये 767 घरगुती तर 2 सार्वजनिक, पूर्णगडमध्ये 5 हजार 685 खासगी, तर दाभोळमध्ये 1 हजार 934 खासगी तर 1 सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.