
दरम्यान राम मंदिराच्या भुमिपुजनाचे निमंत्रण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नाही, या मुद्यावरून शिवसेनेनी भाजपला फटकारलं. खासदार विनायक राऊत यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपवर प्रहार केला आहे. प्रभू रामचंद्र केवळ हे केवळ भाजपचेच आहे हे दाखवण्याचा भाजपकडून प्रयत्न होत आहे.
राम मंदिर निर्मीतीचा मार्ग ज्यांच्या ज्यांच्या प्रयत्नातून होतोय त्यांची जाणीव ठेवणं आज आवश्यक आहे. पण दुदैवाने तसे होत नाही, कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामजन्मभूमीत गेले तर राम मंदिराचे श्रेय शिवसेनेला जाईल, त्याची भाजपला भिती वाटत असेल असं मत खासदार विनायक राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. तर आँनलाईन भुमिपुजनाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुचवलेला पर्याय योग्यच असल्याचं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केलं आहे. राम मंदिराच्या भुमिपुजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेकडो लोकांना एकत्र बोलणवणं योग्य नाही, असं करणे म्हणजे आयसीएमआरच्या निर्णयाचे हे उल्लंघन करणारं असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.
नाणार रिफायनरी संदर्भात केंद्राकडून राज्याला कुठलाही अल्टिमेटम नाही, आशा वावड्या म्हणजे प्रकल्पाच्या दलालांनी उठवलेली आरोळी आहे. स्थानिकानी म्हटलं तर सरकार नाणारचा करार करायला तयार आहे. पण सध्या स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध त्यामुळे प्रकल्पाला विरोध कायम असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सष्ट केलं आहे.