
रत्नागिरी : येथील विशेष कारागृह अधिकारी, कर्मचारी गणेशोत्सव मंडळातर्फे श्री महापुरुष बाबा मंदिरात गणपतीची प्रतिष्ठापना आज करण्यात आली. गणेश चतुर्थीनिमित्त आज पहिल्या पुजेचा मान रत्नागिरीची माजी आमदार सुरेंद्रनाथ तथा बाळासाहेब माने यांना दिला. याप्रसंगी पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी गणरायाची आरती केली.

महापुरुष मंदिरामध्ये या गणपतीची प्रतिष्ठापना केली असून गेली अनेक वर्षे मंडळातर्फे गणेशोत्सवात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भजन, कीर्तन, आरत्या या कार्यक्रमाला कारागृहातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आसपासचे नागरिकही येत असतात. आज गणपतीच्या पूजेचा मान श्री. माने यांना मिळाला. या वेळी पूजा, आरती मंत्रपुष्प झाल्यानंतर कारागृह अधीक्षक रामराजे चांदणे यांनी बाळासाहेब माने यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.