मुंबई: मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी परवानगी देण्याकरिता पालिकेकडे यंदा २६९४ अर्ज आले. त्यातील ५९४ अर्ज रद्द करण्यात आले असून काही त्रुटींमुळे २२३ अर्ज नाकारण्यात आले आहेत. तर उर्वरित ४५२ अर्जावर पुढील दोन दिवसात निर्णय घेऊन मंडप परवानगी प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे आश्वासन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिले. तसेच गरज पडल्यास मंडप परवानगीसाठी २ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची सूचना प्रशासनाला करण्यात येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले.
यंदा पहिल्यांदाच मंडपासाठी ऑनलाइन परवानगी देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली .त्यामुळे अर्जदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करणे अत्यंत आवश्यक आहे.यातून पालिकेकडे गणेश मंडळांचा अभिलेख तयार होणार असून त्यामुळे ज्या गणेश मंडळांच्या प्राथमिक स्वरूपाच्या कागदपत्रांमध्ये बदल नसेल,त्यांना पुढील वर्षांपासून ती कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागणार नाहीत.सुट्टीच्या दिवशीही परवानगी देण्यासाठी पालिकेची सर्वच कायालये सुरू ठेवण्यात आली.यंदा २६९४ विक्रमी अर्ज आले.त्यापैकी एकाच मंडळांचे अनेक अर्ज आल्याने तसेच अन्य कारणांमुळे ५९४ अर्ज रद्द करण्यात आले. राहिलेल्या २१०० अर्जंपैकी १४२५ परवानग्या (६७%) देण्यात आल्या . पालिका व पोलिसांच्या छाननीमध्ये २२३ अर्ज (१०%) नाकारण्यात आले.तर उरलेल्या ४५२ (२३%) अर्जावर येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असेही महापौरांनी सांगितले.न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटीनुसारच या परवानग्या देण्यात येणार असून अग्निशमन नियम ,पदपथ पादचाऱ्यांना मोकळे ठेवणे ,वाहतुकीस अडथळा न होऊ देणे इ.अटींची पूर्तता करणे बंधनकारक आहे. उच्च न्यायालय ,पोलीस यांच्या निर्देशानुसार अंबुलन्ससाठी जागा न ठेवल्याने सदर २२३ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गणेशोत्सव समनव्यक समितीचे लीलाधर डाके, विनोद घोसाळकर यांच्यासह अन्य सदस्य तसेच परिमंडळ २ चे उपायुक्त व महापालिका श्री गणेशोत्सवाचे समनव्यक नरेंद्र बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना मंडपासाठी परवानगी नाकारू नका,अशी सूचना यावेळी लीलाधर डाके यांनी केली.