
घाटकोपर : घाटकोपर पश्चिम विधासभा क्षेत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभाग अध्यक्षपदी गणेश चुक्कल यांची आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवड करत नियुक्त पत्रक दिले. आगामी 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने बांधणी सुरु केली असून मुंबईत नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. माजी नगरसेवक संजय भालेराव यांची गतवर्षी राज ठाकरे यांनी विभाग अध्यक्षपदी निवड केली होती. भालेराव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या विधासभा क्षेत्रातील विभाग अध्यक्षपद रिक्त होते. मनसेने आपले बालेकिल्ले परत मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.