मुंबई (शांताराम गुडेकर ) : गणेश भक्त कोकणवासिय प्रवासी संघ, मुंबई “वार्षिक विद्यार्थी गुणगौरव सोहळा-२०२२ श्री सुरेंद्र गावस्कर सभागृह, दादर येथे मान्यवरांच्या उपस्थित नुकताच थाटामाटात संपन्न झाला.गणेश भक्त कोकणवासिय प्रवासी संघ, मुंबई या प्रवासी संस्थेच्या वतीने गणपती उत्सव आणि पंढरपूर यात्रेसाठी ग्रुप बुकिंग करून देण्याचे नियोजन केले. एक हजारा पेक्षा जास्त सभासद असून यावर्षी प्रवासी संस्थेकडे ५०० ग्रुप बुकिंग अर्ज आले आहेत.
प्रवासी संस्था हे करत असताना इतर ही उपक्रम राबावत असते त्यात विद्यार्थी गुणगौरव,स्नेहसंमेलन विदयार्थी मार्गदर्शन,आश्रम आणि आदिवासीपाडा यांच्यासाठी देणगीतून आपले कर्तव्य बजावत आहे.यावर्षी आषाढी एकादशी असताना सुद्धा गुणगौरव सोहळयाला कमालीची उपस्थिती होती. मान्यवरांच्या उपस्थिती विद्यार्थांना सन्मानित करण्यात आले. त्यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला जिवन आनंद या संस्थेचे संस्थापक, चिटणीस मा. संदीप परब , मा.भाग्येश लाड, समाजसेवक मा. डॉ. भगवान काळे,एसटी अधिकारी श्री भडकमकर तसेच महाराष्ट्र संध्याचे पत्रकार मनोज कदम उपस्थिती होते.
संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री दिपक चव्हाण , कोषाध्यक्ष श्री विश्वनाथ मांजरेकर , संघटक श्री अनिल काडगे आणि विभाग वार पदाधिकारी यांनी एसटी बुकिंग संदर्भात सभासदांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष श्री रवींद्र मुकनाक यांनी मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. सूत्रसंचालन कार्यवाहक चंद्रकांत बुदर यांनी केले.