मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) : विविध क्षेत्रात अग्रेसर असलेल्या गणेश भक्त कोकणवासिय प्रवासी संघाच्या गणेशभक्त दिनदर्शिका -२०२३ चा प्रकाशन सोहळा थाटामाटात रविवार दि.९/१०/२०२२:रोजी संस्थेच्या कार्यालयात परेल, मुंबई येथे श्री.रवींद्र मुकनाक यांच्या अध्यक्षते खाली एस्.टी.महामंडळाचे मान्यवर अधिकारी यांच्या हस्ते, संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि हितचिंतक यांच्या उपस्थित संपन्न झाला.
दिनदर्शिका२०२३चे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष श्री.रवींद्र मुकनाक यांच्या अध्यक्षतेखाली, मा.बांदल (अधिकारी,विभाग नियंत्रक कार्यालय ठाणे,) मा.अंजली मानमोडे (अधिकारी, एस्.टी.मध्यवर्ती कार्यालय),श्री. सोनवलेकर (ए.टी.एस्. ठाणे आगार) यांच्या हस्ते करण्यात आले.
मा. बांदल, सौ.मानमोडे आणि मा. सोनवलेकर या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रवासी संघ हा एस्.टी.च्या हिताचाच विचार करत असल्याचे सांगितले.गौरी-गणपती सण, हॊळी सण, पंढरपुर यात्रा, उन्हाळी हंगामात जास्तीत जास्त गाड्यांचे नियोजन गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाचे असते.येणाऱ्या पंढरपूर वारीला लागणाऱ्या गाड्याचे योग्य नियोजन करून देण्यात येईल असे सांगण्यात आले.या प्रवासी संघ कोकणातील अग्रगण्य प्रवासी संघ असुन संपूर्ण महाराष्ट्रात या प्रवासी संघाने आपले कार्यक्षेत्र वाढवावे असे सौ.मानमोडे मॅडम यांनी सांगितले.
प्रवासी संघाची प्रस्तावना करताना कार्याध्यक्ष श्री.दीपक चव्हाण यांनी प्रवासी संघाची दिनदर्शिका याबद्दल माहिती देताना संस्थेचे उपक्रम,तसेच पुढील वर्षातील नियोजित सभा आणि कार्यक्रम त्याच बरोबर एस. टी.डेपोंचे संपर्क नंबर, सभासद नंबर सहित कोठून कुठपर्यंत गाडी याची सर्व माहिती दिनदर्शिके मध्ये असते.त्यामुळे ही एक मार्गदर्शिका आहे असे मत व्यक्त केले.
दिनदर्शिका पूर्व तयारी त्यामागील कार्यकर्ते यांची घेतलेली मेहनत या बदल संघटक श्री.अनिल काडगे यांनी आभार व्यक्त केले. त्याचबरोबर जाहिरातीदारांचे ही आभार व्यक्त केले. या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला संघ पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक आणि मान्यवर सभासद यांचे आभार मानून अध्यक्ष श्री.रविंद्र मुकनाक यांनी सोहळ्याची सांगता केली.सोहळ्याचे संपूर्ण सूत्रसंचालन नालासोपारा अध्यक्ष श्री.अजित दौंडे यांनी केले.