
2025 च्या मधल्या टप्प्यावर भारतीय संगीतप्रेमींच्या आवडीत मोठा बदल दिसून येतोय. ‘गाणा’चा ‘मिड-ईयर मॅजिशियन्स’ कॅम्पेन या बदलाच्या तालावर ठेका धरून आहे. अजूनही बॉलीवूड गाणी लोकप्रियतेचं केंद्रबिंदू आहेतच, पण गाणा’च्या प्लॅटफॉर्मवरून आलेले आकडे सांगतात की आता लोकांची आवड हळूहळू प्रादेशिक भाषांमध्ये, फ्यूजन म्युझिकमध्ये आणि भावनिक जोड असलेल्या गाण्यांकडे झुकतेय.
ही फक्त प्लेलिस्टमध्ये झालेली उलथापालथ नाही — ही एक सांस्कृतिक क्रांती आहे. मेट्रो शहरांपासून ते टियर-२ शहरांपर्यंत सगळीकडे, श्रोते आता अशा संगीताकडे ओढले जातायत जे भाषा आणि संगीताच्या विविध परंपरांना आवाज देतं.
यावर्षी सर्वाधिक स्ट्रीम झालेले कलाकार फक्त सिनेमातले नाहीत — ते देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेत आणि आपल्या स्थानिक चालींना देशभरात ओळख मिळवून देतायत. महाराष्ट्र, हरियाणा, तामिळनाडू आणि बिहारमधून आलेल्या आवाजांनी टॉप चार्ट्समध्ये आपली जागा पक्की केलीय, आणि यामुळे श्रोत्यांच्या सवयींमध्ये झालेल्या बदलाचा संकेत आहे.

मराठमोळा गायक संजू राठोड यांची गोष्ट तर एकदम प्रेरणादायी आहे. त्यांची गाणी — ‘शेकी’ आणि ‘गुलाबी साडी’ — यांनी तर स्ट्रीमिंग रेकॉर्डच तोडले. यावरून स्पष्ट कळतं की प्रादेशिक संगीत आता “फक्त काही लोकांसाठी” उरलेलं नाही, तर आता ते मुख्य प्रवाहात आलंय.
तसंच, हरियाणवी लोकगायक मासूम शर्मा यांचं गाणं ‘लोफर’ शहरी आणि ग्रामीण तरुणांमध्ये एकदम फेमस झालं. गाण्यात पारंपरिक हरियाणवी टच आहे, पण त्याला दिलेली आधुनिकतेची जोड कमाल आहे— म्हणूनच ते इतकं गाजलं.
भोजपुरी गायिका शिल्पी राज यांनी 2025 मध्येही आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली. त्यांचं गाणं ‘बंदूक’ अशा श्रोत्यांना खूप भावलं ज्यांना बेधडक, एनेर्जेटिक गाणी ऐकायला आवडतात.
तामिळ संगीताकडून साई अभ्यंकर यांनी आपल्या मखमली आवाजाने, ‘सिथिरा पुथिरि’, ‘आसा कूडा’, आणि ‘विज्हि वीकुरा’ या गाण्यांमधून एक आपला वेगळा फॅन बेस तयार केलाय.
हिंदी संगीत क्षेत्रात, अरिजीत सिंह याने ‘ज़माना लगे’ आणि बंगाली गाणं ‘तोमाके चाय बोले छिलेम’ यामधून पुन्हा एकदा भावनिक कनेक्शन सिद्ध केलं — आणि हे गाणं बंगालच्या बाहेरही खूप ऐकले गेलं. श्रेया घोषालने हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा तिन्ही भाषांमध्ये आपल्या मधुर आवाजाने सगळ्यांना भुरळ घातली. अनिरुद्ध रविचंदरच्या ‘सवादीका’, ‘हृदयम लोपाला’, आणि ‘धीमा’ या गाण्यांनी त्याला पॅन इंडिया स्टार म्हणून अजून पक्का केलंय.
ज्येष्ठ संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांनी ‘मेट्रो…इन दिनों’ या अल्बममधून या वर्षातल्या बेस्ट म्युझिक अल्बम्समध्ये आपली छाप सोडली. दुसरीकडे, एस. पी. बालासुब्रमण्यम यांच्या जुन्या ‘क्लासिक’ गाण्यांनी कमबॅक करून लोकांच्या भावनांना हात घातला.
आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलवर, एड शीरन आणि अरिजीत सिंह यांची जुगलबंदी ‘सफायर’ ह्या गाण्याने भारतीय प्लेलिस्टला जागतिक स्तरावर नेलं.
संपूर्ण गोष्ट पाहता आता हे स्पष्ट होतंय की भारतीय संगीताचं चित्र वेगाने बदलतंय — आता प्रादेशिक कलाकार, नवीन शैली आणि भावनांनी भरलेली अभिव्यक्ती हाच खरा ‘ट्रेंड’ बनतोय. ‘गाणा’चा मिड-ईयर राऊंडअप केवळ हे दाखवत नाही की भारत देश काय ऐकतोय, तर हेही दाखवतंय की भाषा आणि आवाज यांच्यामधून आपली ओळख आणि भावना कशा प्रकारे घडत आहेत.
जसं जसं हे वर्ष पुढे सरकेल, तसं हे परिवर्तन अजून खोल रुजेल — अजून जास्त प्रादेशिक सूर राष्ट्रीय मंचावर झळकतील आणि 2025 च्या हिट गाण्यांची व्याख्या नव्याने होईल!















