नवी दिल्ली : भारताच्या जीसॅट-१७ या संवाद उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. फ्रेंच गयाना इथल्या कौरू इथून युरोपीय संघाच्या एरियाना ५ या प्रक्षेपकाद्वारे भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री पावणेतीन वाजता उपग्रहाचे प्रक्षेपण झाले. ३९ मिनिटातच उपग्रह प्रक्षेपकापासून विलग झाला. त्यानंतर कर्नाटकमधल्या हसन इथल्या इस्रोच्या मास्टर कंट्रोल फॅसिलिटीने उपग्रहाचे नियंत्रण आपल्या हाती घेतले.
जीसॅट-१७ चे वजन ३,४७७ किलो असून त्यावर हवामानशास्त्रीय आकडेवारीसाठीची साधने आणि शोध व बचाव सेवेसाठीची साधनेही आहेत.