रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची निवडणूक खेड तालुक्यात होत आहे. येथील जिल्हा परिषदेच्या फुरूस या गटातून दोन दिग्गज नेत्यांचे नातेवाईक नशिब आजमावत आहेत. या गटातून पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेसचेचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कदम यांचे सख्खे भाऊ चंद्रकांत कदम उर्फ अण्णा हे शिवसेनेच्या तिकिटावर आणि तटकरे यांचे मेहूणे अजय बिरवटकर राष्ट्रवादीसाठी निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना अशी थेट लढत या गटात पहायला मिळणार आहे.
अण्णा कदम हे खेड पंचायत समितीचे सभापती असल्यामुळे विविध विकासकामे त्यांनी केली, असा त्यांच्या गटाने केला आहे. राष्ट्रवादीचे अजय बिरवटकर हे जिल्हा परिषदेचे विरोधीपक्षनेते आहेत, त्यामुळे आपण या जिल्हा परिषद गटात चांगले काम केलं आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद गटातून आपलाच विजय होईल, असा विश्वास बिरवटकर यांनी व्यक्त केला आहे.