मुंबई: फनस्कूल इंडिया लिमिटेड, या भारतातील आघाडीच्या खेळणी बनविणाऱ्या कंपनीने शहरातील सर्व बेब्लेड चाहत्यांसाठी बेब्लेड चॅलेंज’स्पर्धेची घोषणा केली आहे. हि स्पर्धा बेंगळुरू,चेन्नई, मुंबई,कोलकाता आणि दिल्ली येथील प्रमुख मॉल्समध्येहोणार आहे. मुंबई मध्ये ही स्पर्धा शनिवार २८ जुलै रोजी दुपारी १ ते रात्री ९ वाजे पर्यन्त व रविवारी २९ जुलै रोजी संध्याकाळी ४ ते ७ वाजे पर्यन्त गोरेगाव येथील ओबेरॉय गार्डन सिटी मॉल,वेस्टन एक्सप्रेस हायवे ,गोरेगाव -पूर्व , मुंबई-४०००६३ येथे होणार आहे .
ही स्पर्धा ८ ते १३ वयोगटातील मुला- मुलीं साठी असून ती मोफत आहे
इच्छुक स्पर्धकांनी आपले नाव मिस. शीतल-( + 91 9819201239)
यांच्या कडे नोंदणी करावी.
प्रत्येक शहरातून अंतिम / क्वालीफायर्स १९ ऑगस्टला दिल्ली मध्ये एकमेकां बरोबर लढतील व त्या मध्ये जो विजयीहोईल त्याला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. हया स्पर्धेची अंतिम लढत किडेक्सपो,पॅरिस,फ्रान्स येथे ३ नोव्हेंबर २०१८ रोजी होणार आहे.