कोल्हापूर :’फ्रायडे फॉर फ्युचर’ या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर शहरात शुक्रवारी विविध शाळांतील विद्यार्थ्यींनी मानवी साखळी करून पर्यावरण रक्षणाची साथ दिली. त्यामध्ये शिवाजी मराठा हायस्कूल ( संध्यामठ गल्ली, शिवाजी पेठ ), माझी शाळा, सुसंस्कार हायस्कूल ( कदमवाडी-भोसलेवाडी ) राजर्षी शाहू हायस्कूल ( क्रांतिसिंह नाना पाटील नगर), आदर्श प्रशाला ( सरनाईक गल्ली ), देशमुख हायस्कूल ( साने गुरुजी वसाहत ) या शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
शिवाजी मराठा हायस्कूल चे मुख्याध्यापक काटकर सर यांची उपस्थिती होती, मुलांना पर्यावरणाची प्रतिज्ञा देण्यात येऊन रंकाळाच्या बाजूच्या रस्त्यावर मानवी साखळी करण्यात आली. यावेळी ‘एसएफआय चे नवनाथ मोरे, रत्नदिप सरोदे, अविनाश माळी यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. मुलांना पर्यावरणाची शपथ दिली. शिक्षण आणि विद्यार्थी उपस्थितीत होते
सुसंस्कार शिक्षण मंडळाचे संस्थापक एम.एच.मगदूम, ‘माझी शाळेच्या मुख्याध्यापिका अरूणा हुल्ले, सुसंस्कार हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय भोगम यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी आदी उपस्थितीत होते.
‘सर्वच ठिकाणी पर्यावरण वाचवा, देश वाचवा,’ ‘जंगल वाचवा, मानव वाचवा,’ ‘प्रदूषणाचा धूर, आणतो महापूर,’ ‘झाडे लावा, झाडे जगवा आदी फलक घेऊन विद्यार्थी उपस्थितीत होते. याच घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधले जात होते. देशमुख हायस्कूलमध्ये उमाकांत चव्हाण यांनी कोल्हापूरात आलेल्या पुराची कारणमीमांसा करून पर्यावरणपूरक जीवनशैलीवर व्याख्यान दिले.