डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे माजी भाजपा नगरसेवक तथा खंबाळपाडा येथील लोकनेते स्वर्गीय शिवाजी शेलार यांच्या जयंतीचे औचित्य साधून विद्यमान नगरसेवक साई शेलार आणि रोटरी क्लब ऑफ क्रॉऊनसीटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आयुर्वेदिक रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शिबिराला भेट देऊन शिबिरातील उपस्थित नागरिकांची विचारपूस करून आयोजक साई शेलार यांचे कौतुक केले.
प्रारंभी स्वर्गीय शिवाजी शेलार यांच्या वैशिष्ठ्यपूर्ण कार्याच्या माहितीची चलचित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी भाजपा नगरसेवक तथा कडोंमपा स्थायी समिती सभापती राहुल दामले, परिवहन सभापती सुभाष म्हके, भाजपा जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, माजी नगरसेविका शिल्पा शेलार, नगरसेवक विसु पेडणेकर, निलेश म्हात्रे, संदीप पुराणिक, डोंबिवली भाजपा अध्यक्ष संजीव बिडवाडकर, राजू शेख, दिलीप भंडारी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्वेकडील खंबाळपाडा येथील मंजुनाथ कॉलेज मध्ये सदर मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात नाडी परीक्षण, रक्तदाब तपासणी, बि.एम.आय. तपासणी, शरीर प्रकृती निदान, मधुमेह तपासणी, प्लस ओक्सीमिटर, इसीजी तपासणी तसेच नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया आदींचा समावेश होता. दिवसभर स्रुरू असलेल्या तपासणी शिबिरात हजारो गरजू रुग्णांनी लाभ घेतला.