रत्नागिरी : तालुक्यातील तरवळ बौद्धवाडी येथे एका पिसाळलेल्या कोल्ह्याने धुमाकुळ घातला. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास कोल्ह्याने वस्तीत घुसून एका शाळकरी मुलीसह तिघांना चावा घेतला. तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
तरवळ बौद्धवाडीत काही दिवसांपासून कोल्ह्याचा मुक्त संचार सुरु होता. तो त्रास देत नसल्याने कोणीही गांभिर्यांने पाहिले नव्हेत. सोमवारी कोल्हा पिसाळला आणि वाडीत घुसला.