
रत्नागिरी : मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या चिपळूण नगरपालिकेचे माजी प्रशासकीय अधिकारी रामदास सावंत यांचा मृतदेह आज सकाळी आढळून आला आहे त्यांच्या डोक्यावर जबर मार बसला असून त्यांच्या खून झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चिपळूण शहरातील बावशेवाडी येथे रामदास सावंत यांचा मृतदेह आढळून आला.
मंगळवार संध्याकाळपासून रामदास सावंत हे बेपत्ता होते. आज सकाळी बावशेवाडी परिसरात काही मुलांना रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर याची खबर पोलिसांना मिळताच तातडीने चिपळूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हा मृतदेह रामदास सावंत यांचा असल्याचं काही ग्रामस्थांनी सांगितले. सावंत यांच्या डोक्यात दगडाने मारल्याचा खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून ही हत्या नेमकी कोणी व का केली याचा तपास सध्या चिपळूणचे पोलीस करत आहेत.
















