
सोशल डिस्टंसिंग ठेवताना स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्याची अपरिहार्य गरज लक्षात घेऊन ही संकल्पना मांडली गेली आहे. एखादी व्यक्ती आपल्या आवडीच्या मार्गावर, सोयीच्या वेळी आणि अनुकूल असलेल्या मार्गाने चालू शकतात. आपल्या सोयीनुसार व्यक्ती ब्रेक घेऊ शकतात, असा हा उपक्रम आहे.
रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेचे मुख्यालय, विभागीय कार्यालये आणि कार्यशाळात ही संकल्पना मोठ्या प्रमाणात सुरू केली गेली आहे.
एस. वावरे, अध्यक्ष, मध्य रेल्वे क्रीडा संघटन (सीआरएसए) आणि प्रधान मुख्य विद्युत अभियंता, सर्व विभागांचे प्रधान विभाग प्रमुख, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुख्य कार्यशाळा व्यवस्थापक, क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, इतर अधिकारी आणि कर्मचारी यांनी या चळवळीस मनापासून पाठिंबा दर्शविला.
१५ ऑगस्ट २०२० पर्यंत मध्य रेल्वेच्या ४८७ सदस्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी १९०० किलोमीटर धावणे / चालणे यशस्वीरित्या पूर्ण केले ज्यायोगे या चळवळीची एक चांगली सुरुवात झाली आहे. या चळवळीत सामील होणा-या कर्मचार्यांची संख्या वाढत आहे. मध्य रेल्वे सकारात्मक आहे की, ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ कर्मचार्यांना त्यांची तंदुरुस्ती सुधारण्यास मदत करेल आणि त्यायोगे कोरोना रोगाला अधिक चांगल्या प्रकारे लढा देता येईल.