
हे मार्केट शंभर वर्षे जूने असून कोळी समाजाची जागा असल्याने त्यांना परवाना वाटपात प्राधान्य मिळावं, अशी मागणी यावेळी करण्यात आले. आंदोलनानंतर पालिकेने परवाने वाटप तूर्तास थांबवले.
मालाड मच्छी मार्केटमध्ये मासे विकण्यासाठी परवाने देताना पारंपरिक पद्धतीने मासेविक्रीचा व्यवसाय करणार्यांना डावलण्यात येत आहे. या विरोधात दिनांक 24, ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता ते दुपारी 1 वाजेपर्यंत आंदोलन करण्यात आले. यानंतर पालिकेने परवाने वाटप थांबवले.
राष्ट्रवादी काँग्रेस मच्छीमार सेलच्या उत्तर मुंबई अध्यक्षा राजेश्री भगवान पाटील यांच्या नेतृत्वात परवाने वाटपाला विरोध करण्यात आला. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारआणि मच्छीमार सेलचे अध्यक्ष चंदू पाटील यांना व मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे. मच्छीमार समाजाच्या महिलांना परवाना देताना डावलून इतर कोणाला दिल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.