मुंबई, 19 ऑक्टोबर 2021: मुंबईमध्ये पहिल्यांदाच, इंटरव्हेन्शनल स्ट्रक्चरल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. रविंदर सिंह राव यांनी लिलावती रुग्णालयात एकाच दिवशी चार रुग्णांवर TAVI (ट्रान्सकॅथेटर ऑर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन) उपचार केले. TAVI सुरक्षितपणे व प्रभावीपणे कसे करते येऊ शकते, हे संयोजक अध्यक्ष डॉ. रविंदर सिंह राव आणि शस्त्रक्रिया करणारी त्यांची टीम यांनी गेल्या आठवड्यात मुंबईत आलेल्या देशभरातील 185 कार्डिऑलॉजिस्टना दर्शवले. लोकल अनेस्थेशिया देऊन आणि कॅथेटरद्वारे ऑर्टिक व्हॉल्व्ह बदलण्यात आला. रुग्णांना रात्रभर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी अन्य खोलीत हलवण्यात आले.
या विशिष्ट उपचारपद्धतीबद्दल बोलाताना लिलावती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्डिआक सर्जन डॉ. रवी शंकर यांनी नमूद केले, तीव्र ऑर्टिक स्टेनॉसिस असलेल्या रुग्णांसाठी TAVI ही जीवरक्षक उपचारपद्धती आहे. लिलावतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या TAVI च्या प्रगत शैक्षणिक उपक्रमामध्ये एकाच दिवशी चार क्लिष्ट स्वरूपाचे TAVI उपचार करण्यात आले आणि या उपक्रमामुळे या रुग्णालयामध्ये सर्वोत्कृष्ट उपचार केले जात असल्याचे अधोरेखित झाले आहे. असे उत्कृष्ट रुग्णालय आणि एकात्मिक दृष्टिकोन यामुळे सुरक्षित उपचार केले जातात आणि ते आंतरराष्ट्रीय मापदंडांच्या तोडीचे असतात.
एमडी, डीएम, एफएसीसी, चिफ इन्व्हेन्शन कार्डिऑलॉजिस्ट, कॉम्प्लेक्स पीसीआय व TAVI कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. रविंदर सिंह राव म्हणाले, ऑर्टिक स्टेनॉसिस म्हणजे ऑर्टिक व्हॉल्व्ह अरुंद होत जाणे. यावर एकमेव उपाय आहे तो म्हणजे व्हॉल्व्ह बदलणे. या आजारावर औषधे प्रभावी ठरत नाहीत. असे त्रास असलेल्या रुग्णांवर ओपन हार्ट सर्जरी करावी लागते. परंतु, फेमोरल आर्टरीद्वारे (ग्रॉइन व्हेसल) उपचार केल्यास TAVI ही उपचारपद्धत ओपन हार्ट सर्जरीपेक्षा सरस असल्याचे वैद्यकीयदृष्ट्या आता सिद्ध झाले आहे.
भारतातील ही पहिलीवहिली जीवरक्षक उपचारपद्धती शहा यांच्यावर करण्यात आली. शहा 70 वर्षीय असून त्यांना अनेक वैद्यकीय समस्या आहेत. त्यांच्यावर ओपन हार्ट सर्जरी करणे शक्य नव्हते. डॉ. राव यांनी आयव्हीएल लिथोट्रिप्सी असिस्टेड TAVI उपचार केले. कॅल्सिफाइड ब्लॉकेजसाठी आयव्हीएल अँजिओप्लास्टी करण्यात आली आणि त्यानंतर रक्तवाहिनी डायलेट करण्यात आली. यानंतर त्यांनी यशस्वीपणे व सुरक्षितपणे TAVI उपचार केले.















