› ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या डीलरशीपमध्ये आजपासून स्लाविया पाहता येईल आणि फर्स्ट लुक अनुभवता येईल
› मार्चच्या सुरुवातीला किमतीच्या घोषणेसोबतच टेस्ट ड्राइव्ह आणि डिलिव्हरी सुरू होतील
› भारतभरातील १५० हून अधिक शोरूम्समध्ये स्लाविया उपलब्ध असेल
› स्लावियासाठी प्री बुकिंग सुरू
मुंबई, 7 फेब्रुवारी 2022 : स्कोडा ऑटो इंडियाने आज भारतभरातील त्यांच्या शोरूम्समध्ये नव्या प्रीमिअम मिड साइज सेडान स्लाविया प्रदर्शनासाठी उपलब्ध होत असल्याची घोषणा केली. ग्राहकांना या गाडीचा वैयक्तिक अनुभव तसेच त्यातील वैशिष्ट्यांची सखोल माहिती करून घेता येईल. प्री बुकिंग्स सुरू झाल्या असल्या तरी टेस्ट ड्राइव्हस आणि ग्राहकांना डिलिव्हरीज मार्च २०२२ च्या सुरुवातीला किमतीची घोषणा झाल्यानंतर सुरू होतील.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर झॅक होलीस म्हणाले, “2.0 प्रोजेक्ट अंतर्गत स्लाविया ही स्कोडा ऑटो इंडियासाठी दुसरे रत्न आहे. या सेडानमुळे या दमदार बाजारपेठेतील आमचे स्थान अधिक बळकट होईल आणि त्याचप्रमाणे प्रीमिअम मिड साइज सेडान विभागाला नवे स्वरूप, नवा उत्साह मिळेल. स्लावियामुळे आम्ही सेडान वर्गाचे प्रेम पुन्हा मिळवू शकू, असा आम्हाला विश्वास आहे. ही सुंदर कार आता आमच्या ग्राहकांपासून फक्त एक पाऊल दूर आहे. हा फार महत्त्वाचा क्षण आहे. कारण, स्लाविया हे नाव स्कोडा इंडियाच्या भारतातील वारशाचे प्रतिक आहे आणि जागतिक स्तरावरील सुद्धा.”
जुलै 2021 मध्ये सादर झालेल्या कुशाक एसयूव्हीनंतर मेड-फॉर-इंडिया MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर तयार झालेली स्लाविया ही स्कोडा ऑटो इंडियाची दुसरी गाडी आहे. 1.0 ली. 3 सिलेंडरच्या टर्बोपेट्रोल आणि 1.5 ली. 4 सिलेंडर टर्बोपेट्रोलमुळे अनुक्रमे 85kW (115ps) आणि 110kW (150PS) अशी ताकद मिळालेल्या स्लावियामध्ये 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड अॅटोमॅटिक आणि 7 स्पीड डीएसजी ट्रान्समिशन असे पर्याय आहेत.
1752mm सह स्कोडा स्लाविया ही या प्रीमिअम मिड साइज सेडाने विभागात सर्वात रुंद कार असल्याने या कारमधील प्रशस्त केबिनमध्ये पाच व्यक्तींसाठी तुम्हाला या वर्गातील सर्वाधिक जागा आणि आराम मिळतो. 521 ली. अशा बूट कपॅसिटीमुळे स्लाविया या बाबतीतही सर्वात आघाडीवर आहे. मागच्या सीट प्रशस्त तर आहेतच शिवाय ड्युएल एसी वेंट्स आणि पर्सनल डिव्हाइसेस चार्ज करण्यासाठी ड्युएल यूएसबी पोर्ट असल्याने प्रवाशांची सोय आणि आराम याचीही काळजी घेण्यात आली आहे.
आतल्या बाजूला, गोलाकार एसी वेंट्स असलेल्या डॅशबोर्डसह पुढच्या बाजूचे सौंदर्य वाढले आहे. यातील आकर्षणाचा भाग म्हणजे 25.4 सेमी (10-इंच) टचस्क्रीन ज्यावर तुम्हाला सर्व प्रकारचे इन्फोटेनमेंट आणि प्रवासाच्या गरजा पूर्ण करता येतील. यातील स्मार्टलिंक तंत्रज्ञान आणि फोनमध्ये MyŠKODA अॅप डाऊनलोड केल्यास ही सिस्टम तुमच्या फोनसोबत समन्वय साधते आणि फारशी कनेक्टिव्हिटी नसलेल्या भागातही कस्टमाइज प्रीफरन्स, मीडिया, मनोरंजन, ऑनलाइन नेव्हिगेशन अशा गरजा पूर्ण करते. इतकेच नाही, यातील टचस्क्रीनमधील खास डिझाइनमुळे दोन उद्देश साधले जातात. बाहेरच्या बाजूच्या स्कोडा ग्रीलचे हे प्रतिक आहे शिवाय हाताला आराम देण्यासाठीही याचा वापर होतो. त्यामुळे टचस्क्रीन वापरणे वापरकर्त्यासाठी सोयीचे, सुरक्षित आणि योग्य डिझाइनचे ठरते.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्लावियामध्ये सहा एअरबॅग्स, अँटी लॉक ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, मल्टि कोलिशन ब्रेक्स अशा अनेक सुविधा आहेत. छोट्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात मागच्या सीटवर ISOFIX अँकर्स आणि टेदर पॉईंट अँकर्स देण्यात आले आहेत. केबिनचा दर्जा अधिक वाढवत यात एअरकेअर सुविधाही देण्यात आली आहे. यात बाहेरून केबिनमध्ये येणारी हवा फिल्टर केली जाते.
सुरक्षा वैशिष्ट्ये बाहेरच्या बाजूलाही आहेत. ऑटोमॅटिक हेडलाइट्स, रेन सेन्सिंग वायपर्स आणि टायर्समधील एअर प्रेशर सेन्सर्स अशा वैशिष्ट्यांमुळे दृश्यात्मकता आणि सुरक्षितता वाढते… मग, रस्ते आणि हवामान कसेही असो.
ग्राहकांना नजीकच्या स्कोडा ऑटो इंडिया डीलरशीपला भेट देऊन नव्या स्कोडा स्लावियाचा वैयक्तिक अनुभव घेता येईल.















