रत्नागिरी : परटवणे येथील पिठाच्या चक्कीला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्यामुळे चक्की जळून लाखोंचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवार 26 मे रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
परटवणे येथील मुख्य रस्त्यावर विकास सावंत व सुनील सावंत यांच्या मालकीची पिठाची गिरण आहे. या गिरणीतील एक खोली गादी कारखान्यातील कापूस ठेवण्यासाठी भाड्याने देण्यात आली होती.शुक्रवारी सायंकाळी अचानक शॉर्टसर्किट झाल्याने गिरणीतून धूर येऊ लागला. बघता बघता आगीचे लोळ उठले आणि संपूर्ण गिरण आगीने वेढली गेली.
आगीचे लोळ उठताच सावंत बंधूनी गिरणीतून रस्त्यावर धाव घेतली. आगीची माहिती तातडीने नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केले. मात्र या आगीने घेतलेल्या रौद्ररुपाने पिठाची गिरण जळून खाक झाली.
अथक प्रयत्नानंतर आग शमवण्यात अग्निशमन दलाला यश आले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येते आहे. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.