सर्वात प्रथम कोकणवृत्तवर
मुंबई : कुर्ल्यातील ठक्कर बाप्पा येथे असणार्या चपलांच्या कारखान्यांना आज दुपारी आग लागली आहे. या ठिकाणी चपलांचे होलसेल दुकानांचे मोठे मार्केट आहे. ही आग तेथेही पसरली. आगीत काही झोपड्याही जळून खाक झाल्या. अग्नीशमन दलाच्या नऊ बंबांनी आग विझवण्यासठी शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास दलाला यश आले. या ठिकाणी एका वीज कंपनीची अती उच्च दाबाची वाहिनी गेली होती. परंतु, प्रसंगवधान राखून वीज पुरवठा खंडित केल्याने मोठी दुर्घटना टळली. या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणावर गोदामे आहेत. ही गोदामेही तातडीने खाली करण्यात आली. कारखान्यात कच्चा माल असल्याने धुराचे लोट पसरले. कारखानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागल्याचे कारण समजू शकले नाही.
कोकणवृत्त व्हिडिओ :