रिब्रँडिंगमध्ये प्रवेश करण्यापूर्वी फिनटेक कंपनीने ही प्रक्रिया सहजपणे घेऊ नये. अगदी नवा लोगो किंवा संपूर्ण मार्केट रिपोझिशनिंग अशी सहज प्रक्रिया असली तरीही रिब्रँडिंगमुळे संपूर्ण ब्रँडचा भविष्यातील वृद्धीचा आराखडा बदलला जाऊ शकतो. रिब्रँडिंगचा निर्णय घेताना, ही केवळ एका विभागाची जबाबदरी नाही, हे कंपनीच्या नेतृत्वानेही लक्षात ठेवले पाहिजे. या प्रक्रियेत संस्थेतील प्रत्येक सदस्याने भूमिका बजावली पाहिजे.
फिनटेक क्षेत्रातील वाढती स्पर्धा लक्षात घेता, कोणत्याही रिब्रँडिंग कँपेनद्वारे, हे सुनिश्चित केले पाहिजे की, तुम्ही प्रदान केलेले सोल्युशन्स अधिक अधोरेखित झाले पाहिजेत, जेणेकरून लोक त्याबद्दल अधिक जाणून घेतील. रिब्रँडिंग प्रक्रियेदरम्यान प्रत्येक फिनटेक ब्रँडने लक्षात ठेवण्यासारख्या घटकांबद्दल सांगताहेत एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री प्रभाकर तिवारी.
सर्वप्रथम, रिब्रँडिंगचा मुख्य हेतू स्पष्ट झाला पाहिजे . रिब्रँडिंग कशासाठी आहे आणि का, असे प्रश्न विचारा. तुम्हाला स्वतःची ओळख कशाप्रकारे निर्माण करायची आहे, तुमचे टार्गेट ऑडियन्स आणि स्पर्धक कोण आहेत, यावर भर द्या. यावर संपूर्ण संस्थेत अर्थपूर्ण संवाद घडवून आणा. केवळ तुमची वैयक्तिक मते आणि दृष्टीकोनांवर टिकून राहणे परवडणार नाही.
या प्रश्नांची सर्वसमावेशक उत्तरे देण्यासाठी तुम्हाला सविस्तर मार्केट डेटा आणि संशोधनाची मदत घ्यावी लागेल. तसेच रिब्रँडिंगमध्ये गुंतवणूक करणे सार्थक ठरते, हे लक्षात घ्या. मार्केट शेअर आणि बिझनेस वाढवणे, हाच कोणत्याही रिब्रँडिंगचा नेमका हेतू असतो. मात्र धोरणांना आकडेवारीचा आधार असणे आवश्यक आहे. एकदा तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली की, धोरणात्मक कन्सल्टन्सी फर्मकडे जा, जेणेकरून या प्रक्रियेतील त्यांचा अभ्यास आणि कौशल्याद्वारे तुम्हाला पुढील गोष्टी करता येतील.
त्यानंतर, ब्रँडनेममधून योग्य प्रेरणा मिळणे आवश्यक आहे. प्रत्येक कंपनीला विशिष्ट हेतू असतो. त्यांची उत्पादने आणि सेवांद्वारे ग्राहकांच्या जीवनात बदल घडवण्याचा त्यांचा उद्देश असतो. संस्थेला नेमके काय करायचे आहे, हे ब्रँडनेमद्वारे उलगडत नसेल तर, यामुळे वृद्धीत अडथळा येऊ शकतो. अशा वेळी तत्काळ ब्रँड नेम बदलले पाहिजे. त्यामुळे, ग्राहकांसोबतचे नाते दृढ करण्यासाठी रिब्रँडिंगच्या संधीचा वापर करा. ब्रँडचे नाव बदलताना, ते टार्गेट ऑडियन्सला पटले पाहिजे, याकडे लक्ष द्या. जेन झेड आणि मिलेनिअल्स हे तुमचे टार्गेट मार्केट असू शकते, पण त्यांना तुमच्या ब्रँड प्रतिमेतील तांत्रिक संकल्पना समजत नसेल तर ते त्यापासून दूर होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कोण आहात आणि कशासाठी उभे आहात, हे स्पष्ट दर्शवणा-या नावाची निवड करा.
अखेरीस, तुम्ही पूर्णपणे आपले नवे व्यक्तीमत्त्व ओळखून ते स्वीकारले पाहिजे. रिब्रँडिंगदरम्यान, तुमची पूर्वीची प्रतिमा विसरणे आव्हानात्मक ठरू शकते. विशेषतः ब्रँडशी जुळलेले संस्थापक आणि लीडर्ससाठी हे कठीण ठरू शकते. असे असले तरीही तुम्ही लोकांना तुमचा नवा अवतार स्वीकारायला भाग पाडले पाहिजे. हे करताना, लोकांचा तुमच्यावर आधी जो विश्वास आणि श्रद्धा होती, ती नव्या प्रतिमेद्वारे नष्ट होऊ नये, याकडेही लक्ष दिले पाहिजे. पूर्वीच्या प्रभावाचा वापसा आणि मूल्ये जपत नवी प्रतिमा स्वीकारणे खरोखरच आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळे, माध्यम आणि लोकांशी होणाऱया संवादात नवी ब्रँडची प्रतिमा प्रामुख्याने दिसून आली पाहिजे. यातून तुमचा आत्मविश्वास दिसेल आणि ग्राहकांसोबत अधिक दृढ नाते निर्माण होईल.
तात्पर्य असे की, तंत्रज्ञान कंपनीचे यशस्वी रिब्रँडिंग हे पूर्णपणे डिजिटल सोल्युशन्सवर अवलंबून नसते. यात ग्राहकांना समजून घेणे, अंतर्बाह्य असे दोन्ही प्रकारे संवाद साधणे तसेच तुम्ही नेमके कोण आहात, हे स्वीकरणे, आदी सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत.