~ म्युचुअल फंड्स आणि डिजिटल गोल्डसारख्या सुविधा प्रदान करेल ~
मुंबई, ३ फेब्रुवारी २०२५: आर्थिक सेवांच्या दुनियेत नवीन क्रांती आणणाऱ्या फिनहाट या प्लॅटफॉर्मने आता वितरक आणि यूझर्ससाठी एक अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असा वेल्थ मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म फिनहाट वेल्थ लॉन्च केला आहे. हे पाऊल उचलून कंपनीने आपल्या आर्थिक सेवांचा पोर्टफोलियो व्यापक करण्यासाठी पाया मजबूत केला आहे. हा अनोखा प्लॅटफॉर्म म्युचुअल फंड्स आणि डिजिटल गोल्डसारख्या सुविधा प्रदान करेल आणि पहिल्याच वर्षात २००० वितरकांना या प्लॅटफॉर्मशी जोडण्याचे त्यांचे ध्येय आहे. वितरक बनण्याची प्रक्रिया सुलभ आणि सुरळित बनवण्यासाठी फिनहाट वेल्थने केवायसी, ऑनबोर्डिंग आणि रिडिम्शन वगैरे टप्पे सोपे आणि जलद बनवले आहेत.
फिनहाटचे सह-संस्थापक आणि सीईओ विनोद सिंह म्हणाले, “फिनहाट वेल्थच्या रूपात आम्ही एक साहाय्यक डिजिटल प्लॅटफॉर्म उभा करत आहोत, जो सूक्ष्म-उद्योजक वितरकांच्या नेटवर्कशी भागीदारी करून सोपी, सहजप्राप्य आणि महत्त्वाकांक्षी भारतासाठी अनुरूप अशी वेल्थ मॅनेजमेंट सोल्यूशन्स प्रदान करेल. जी उत्पादने आणि सेवा काळाच्या कसोटीत उत्तीर्ण झाली आहेत, परंतु आजवर सामान्य लोकांपर्यंत पोहोचली नव्हती आशा उत्पादनांपर्यंत आणि सेवांपर्यंतची पोहोच या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुलभ बनवण्याची आमची इच्छा आहे. फिनहाट वेल्थ आर्थिक सुरक्षेच्या नव्या युगाची सुरुवात करून सामान्य भारतीयांची आर्थिक स्वप्ने पूर्ण करण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल.”
गेल्या दोन वर्षात विमा मंचाच्या आपल्या अनुभवातून शिकून फिनहाटने २०० पेक्षा जास्त भागीदार संस्थांचे एक मजबूत नेटवर्क उभे केले आहे, जे भारतातील ८५% पेक्षा जास्त पिन कोड्सपर्यंत सेवा प्रदान करते. या नेटवर्कने ग्रामीण आणि निम-शहरी प्रदेशात ६० लाखांहून जास्त पॉलिसी यशस्वीरित्या जारी केल्या आहेत. आता फिनहाट महत्त्वाकांक्षी, उदयोन्मुख भारतासाठी वेल्थ क्रिएशनच्या नवीन आणि प्रभावी पद्धती अंगिकारून व्यापक बदल घडवण्यासाठी सज्ज आहे.
फिनहाट वेल्थचा उद्देश वेल्थ डिस्ट्रीब्यूटर्स म्हणून सूक्ष्म उद्योजकांचा एक नवीन आणि सशक्त संच तयार करून त्यांच्याशी भागीदारी करून उभरत्या गुंतवणूकदारांच्या सेवेसाठी एक संपूर्ण ईकोसिस्टम प्रदान करण्याचा आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून फिनहाट डिजिटल ऑनबोर्डिंग सुरळीत करत, व्यापक प्रशिक्षण प्रदान करत आणि निरंतर समर्थन देत डिस्ट्रीब्यूटर्सचा आत्मविश्वास वाढवून त्यांना सक्षम बनवत आहे. जे लोक जागरूकता आणि गुंतवणूक पर्यायांपर्यंतची पोहोच पुरेशी नसल्याने मागे राहिले आहेत मुख्यतः अशा भारतीयांची आर्थिक लक्ष्ये साधण्यावर या प्लॅटफॉर्मचे ध्यान केंद्रित आहे. या प्लॅटफॉर्मने डिस्ट्रीब्यूटर्सना डिजिटल दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक सुलभ आणि प्रभावी प्रक्रिया अंगिकारली आहे, हेच या मंचाचे वेगळेपण आहे. पहिल्यांदाच वेल्थ मॅनेजमेंट केवळ डिस्ट्रीब्यूटर्ससाठीच नाही, तर गुंतवणूकदारांसाठी देखील सुलभ बनवण्यात आली आहे, जेणेकरून उदयोन्मुख भारताच्या आर्थिक भविष्याला नवी दिशा मिळू शकेल.