मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकतेच जाहीर केले आहे. फेब्रुवारी- मार्च दरम्यान या परिक्षा होणार आहेत. दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ ते २४ मार्च २०१८ पर्यंत तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०१८ ते २० मार्च २०१८ दरम्यान होतील, असे शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे.
फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूर या नऊ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेचं संपूर्ण वेळापत्रक महाराष्ट्र बोर्डच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्याचे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे.