मुंबई : फेव्हिकॉल पीडिलाइटतर्फे रक्षाबंधनानिमित्नित `फेव्हिकॉल बाँड ऑफ लव्ह’’ या उपक्रमाचे देशातील जवानांच्या सन्मानार्थ उद्घाटन करण्यात आले. जवानांचे धाडसी कार्य मुलांना दाखवणे आणि लष्करातील बंधूंप्रति आदर व सन्मान बहाल करण्यासाठी स्वतःच्या हाताने राख्या आणि भेटकार्डे बनवण्यासाठी मुलांना प्रोत्साहीत करणे हे या कँपेनचे ध्येय आहे.
कारगील विजय दिवसानिमित्ताने या राख्या बनवण्याच्या उपक्रमाला सुरुवात झाली. ५०० शाळांमधील तब्बल १,५०,००० पेक्षा जास्त विद्यार्थी त्यात सहभागी झाले .
पीडिलाइट इंडस्ट्रीजच्या आर्ट आणि स्टेशनरी व्यवसायाचे अध्यक्ष राहुल सिन्हा म्हणाले की, “संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांचा उत्साह भारावून टाकणारा आहे, आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या लष्करातील जवानांना आपल्या हाताने राख्या बनवून पाठवणे आणि धन्यवाद म्हणणे यासाठी मुले फारच मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. आम्हाला आमच्या देशाच्या हिरोंप्रति प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी मार्ग सापडला आहे.’’