मुंबई : कला आणि हस्तकलेचे विविध फायदे आहेत, जसं मुलांना नवी कौशल्ये शिकता येतात आणि त्यांच्या ज्ञानात भर पडते. वेगवेगळ्या गोष्टी एकत्र चिकटवाव्या लागत असल्यामुळे कित्येकदा क्राफ्टिंगचे काम अवघड होते. हे लक्षात घेऊन पिडीलाइट इंडस्ट्रीज लि. या अधेसिव्हज आणि सीलंट बाजारपेठेत आघाडीवरअसलेल्या कंपनीने फेव्हिकॉल A+हे खास उत्पादन लाँच केले आहे, ज्यामुळे मुलांना सहजपणे क्राफ्ट करता येते. फेव्हिकॉल A+च्या मदतीने मुलांना विना– अडथळा तसंच सांडण्याची भीती न बाळगता मुक्तपणे आपल्या सर्जनशीलतेला वाव देता येणार आहे.
फेव्हिकॉल A+च्या मदतीने कार्डबोर्ड, हॅण्डमेड पेपर असे वेगवेगळ्या प्रकारचे पृष्ठभाग चिकटवता येतात. अपेक्षेपेक्षाही जलदगतीने चिकटवण्यास हे उत्पादन मदत करते आणि सजावटीसाठी वस्तूही तयार करता येतात. ग्लू उभ्या रेषेत लावल्यानंतर ओघळणार नाही याची काळजी घेत याचे फॉर्म्युलेशन जास्त चांगल्या प्रकारे तयारकरण्यात आले आहे. यामुळे मुलांचे क्राफ्ट अधिक सोपे होते. याचे बहुस्तरीय गुणधर्म आणि आधुनिक वैशिष्ट्ये मुलांसाठी क्राफ्ट आणखी आनंददायी बनवतात.
शंतनू भांजा, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्राहक उत्पादन, पिडीलाइट इंडस्ट्रीज लि. म्हणाले, ‘कला आणि हस्तकला प्रेमींना आम्ही कायमच नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे आणि इतक्या वर्षांत फेव्हिकॉलएमआरने अधेसिव्ह्जच्या बाजारपेठेत स्वतःला आघाडीचा ब्रँड म्हणून प्रस्थापित केले आहे. आज या स्थानावरून फेव्हिकॉल A+लाँच करत आम्ही ते वेगवेगळ्या पृष्ठभागांवर वापरता येण्याजोगे आणि वापरण्याचा सहज अनुभव देणारे असल्याचे दाखवून देणार आहोत.
उत्पादन भारतातील सर्व स्टेशनरी दुकानांमध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि त्याची किंमत १५ ग्रॅमसाठी १० रुपये, ३० ग्रॅमसाठी २० रुपये आणि ८५ ग्रॅमसाठी ५० रुपये अशी ठेवण्यात आली आहे.