रत्नागिरी दि.17:- राज्य निवडणूक आयोग यांचेकडील 24 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये जिल्ह्यातील दापोली व मंडणगड नगरपंचायतींच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूकांकरीता प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तथापि राज्य निवडणूक आयोगाच्या 17 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशान्वये दापोली व मंडणगड नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाच्या सर्व आरक्षित जागा अनारक्षित (सर्वसाधारण) करण्यात आल्याने सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला आरक्षणाचा व सुधारित फेर सोडतीचा कार्यक्रम 2021 जाहीर केला आहे. त्याबाबतची जाहीर नोटीस 20 डिसेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. तसेच सदर सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूकींचा तपशिलवार कार्यक्रम 28 डिसेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे.













