मुंबई : फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने भारतात फेडएक्स सराऊंड लॉन्च केले आहे, जे पुरवठा साखळी व्यवस्थापनास पुनर्व्याख्यायित करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले एक प्रगत देखरेख आणि हस्तक्षेप सोल्यूशन आहे. नियर-रियल-टाइम व्हिझिबिलिटी, एआय-संचालित प्रेडिक्टिव्ह अॅनालिटिक्स आणि हाताळणीच्या प्रगत क्षमतांच्या आधारे तयार करण्यात आलेले फेडएक्स सराऊंड® व्यवसायांना बेजोड शिपमेंट व्हिझिबिलिटी, नियंत्रण आणि विश्वासार्हता प्रदान करते.
फेडएक्स सराऊंड देखरेख आणि हस्तक्षेप टूल तीन सेवा-स्तर प्रदान करते- निवडक (सिलेक्ट), पसंतीचे(प्रिफर्ड) आणि प्रीमियम; आणि त्याद्वारे आरोग्यसेवा, एरोस्पेस, हाय-टेक उत्पादने यांसारख्या व्यापक उद्योग श्रेणींना महत्त्वाचे अपडेट्स आणि इंटरव्हेन्शन्स प्रदान करते, ज्यामुळे महत्त्वाच्या, संवेदनशील शिपमेंट्सच्या बाबतील खात्रीलायकता आणि वेळेवर डिलिव्हरीची सुनिश्चिती होते.
फेडएक्स सराऊंड देखरेख आणि हस्तक्षेप टूलच्या साहाय्याने फेडएक्स आपल्या ग्राहकांना लवचिकता आणि नियंत्रण, अधिक मूल्य, मनःशांती हे तीन मुख्य फायदे प्रदान करते.
मार्केटिंग अँड एअर नेटवर्क, मिड्ल ईस्ट, इंडियन सबकॉन्टिनेन्ट अँड आफ्रिका फेडएक्सचे उपाध्यक्ष नितीन टाटीवाला म्हणाले, “फेडएक्समध्ये इनोव्हेशनचा अर्थ धाडसी सोल्यूशन्स प्रदान करून प्रत्यक्ष जीवनातील आव्हांनांवर मात करणे असा आहे. एआय, मशीन लर्निंग आणि डेटाचा उपयोग करून आम्ही व्यवसायांना त्यांच्या पुरवठा साखळ्या चालवण्यासाठी नवी सोल्यूशन्स देऊन ती प्रक्रिया निर्बाध, कार्यक्षम आणि लवचिक करत आहोत. फेडएक्स सराऊंड® हे टूल व्यवसायांना संभाव्य अडचणींचा सक्रियतेने सामना करण्यासाठी, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि सक्षम करते आणि प्रत्येक टप्प्यावर मानसिक शांती सुनिश्चित करते.”