मुंबई, १५ एप्रिल २०२५: फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (फेडएक्स) या जगातील सर्वात मोठ्या एक्सप्रेस वाहतूक कंपनीने आपली नवीनतम फेडएक्स-चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) डिजिटल फिल्म भारतात जारी केली. या फिल्ममध्ये सीएसकेचे तीन महान खेळाडू – महेंद्र सिंह धोनी, ऋतुराज गायकवाड आणि रविचंद्रन अश्विन दिसत आहेत.
‘द फेडएक्स फॅक्टर – पॉवरिंग बोल्ड बिझनेस आयडियाज’ नामक ही फिल्म म्हणजे रूढींना आव्हान देणाऱ्या, आपल्या कक्षा विस्तृत करणाऱ्या आणि उद्योगाची नवीन व्याख्या करणाऱ्या नवीन भारताच्या उद्योजकांना – द्रष्ट्यांना वाहिलेली एक आदरांजली आहे. या फिल्ममध्ये क्रिकेटपटूंची लवचिकता आणि उद्योजकांची जिद्द यांच्यातील साम्य दाखवले आहे. या फिल्ममध्ये दाखवले आहे की, जेव्हा उद्योजकाच्या कल्पना आकार घेऊ लागतात, तेव्हा फेडएक्स तो व्यवसाय किती सहजपणे जागतिक बाजारपेठांशी जोडून देतो! आणि यातून या गोष्टीची खातरजमा करतो की, प्रत्येक धाडसी कल्पनेला यशस्वी होण्यासाठी लॉजिस्टिक्सचा आधार मिळेल.
मार्केटिंग, एअर नेटवर्क आणि कस्टमर एक्सपिरियंस, मिड्ल ईस्ट, इंडियन सबकॉन्टिनेन्ट अँड आफ्रिका फेडएक्सचे उपाध्यक्ष नितीन टाटीवाला म्हणाले, “सीएसके सोबतच्या आमच्या अनेक वर्षांच्या संबंधांमुळे व्यवसायांना सक्षम बनवण्याची आमची वचनबद्धता मजबूत करतानाच आम्ही लक्षावधी क्रिकेट चाहत्यांशी देखील कनेक्ट होऊ शकतो. क्रिकेट प्रमाणेच उद्योगात देखील यशस्वी होण्यासाठी चिकाटी आणि रणनीतीची गरज असते. कोणत्याही अभिनव, आउट-ऑफ-द-बॉक्स व्यवसाय कल्पनेला आकार घेण्यासाठी योग्य आधाराची गरज असते आणि आम्हाला अभिमान वाटतो की, धाडसी विचार साकार करण्यासाठी आम्ही व्यवसायांना मदत करतो.”
सीएसकेचे अधिकृत प्रायोजक म्हणून, त्यांच्याशी असलेल्या प्रभावी संबंधांच्या माध्यमातून फेडएक्स भारतात लघु आणि मध्यम व्यवसाय विकासाचे पुरस्कर्ते म्हणून आपली स्थिती मजबूत करत आहे. सीएसके च्या प्रसिद्ध पिवळ्या रंगाच्या जर्सीवर मागच्या बाजूस ठळकपणे दिसणारा फेडएक्सचा लोगो विश्वसनीयता, नेमकेपणा आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे. ही अशी मूल्ये आहेत, जी लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांशी तसेच क्रिकेटच्या चाहत्यांशी देखील एकसमान पद्धतीने संलग्न आहेत.
शिवाय, फेडएक्सने मुंबई, दिल्ली आणि बंगळूरसारख्या बाजारांत काही निवडक को-ब्रॅंडेड फेडएक्स-सीएसके वाहने देखील दाखल केली आहेत. ही वाहने फेडएक्स आणि सीएसके यांच्यात वेग, उत्कृष्टता आणि इनोव्हेशनबाबत असलेल्या सामाईक वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करतात. देशभरातील क्रिकेट चाहते, व्यवसाय अग्रणी आणि उद्योजक यांच्यात मोठ्या प्रमाणात पोहोच सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने ही ब्रॅंड फिल्म सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात येत आहे.