~ भारतीय कारागिरी स्थानिक पातळीवरून जागतिक पातळीवर नेणार ~
मुंबई, 13 नोव्हेंबर : फेडएक्स कॉर्पची साहाय्यक कंपनी आणि जगातील अत्यंत मोठी एक्सप्रेस ट्रान्सपोर्ट कंपनी असलेल्या फेडएक्सने भारत सरकारच्या वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट उपक्रमास समर्थन देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियासोबत सहयोग केल्याचे जाहीर केले आहे. एकत्र मिळून भारतातील छोट्या व्यवसायांना जागतिक बाजारपेठेची पोहोच मिळवून देऊन, त्यांची क्षमता वाढवून आणि त्यांना ब्रॅंडिंग संधी प्रदान करून त्यांच्या विकासाला गती देण्याचा या सहयोगाचा उद्देश आहे.
वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट उपक्रम हा संतुलित प्रादेशिक विकासासाठी भारताच्या माननीय पंतप्रधानांचे जे व्हिजन आहे त्यास अनुसरून आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यातील एका अनोख्या उत्पादनाचा प्रचार करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्थानिक कारागिरांना आणि उत्पादकांना व्यापक समर्थन प्रदान करून हा उपक्रम आजीविका वाढवतो आणि भारतीय कारागिरीतील वैविध्य लोकांसमोर आणतो. हा उपक्रम मेक इन इंडिया व्हिजनशी असलेली देशाची वचनबद्धता दर्शवितो, इनोव्हेशनला प्रोत्साहन देतो आणि स्थानिक व्यावसायिकांना जागतिक मंचावर स्पर्धा करण्यास सक्षम बनवतो.
फेडएक्स, मिडल ईस्ट, इंडिया सबकॉन्टिनेन्ट आणि आफ्रिकाचे अध्यक्ष कामी विश्वनाथन म्हणाले, “जोडलेले (कनेक्टेड) जग हे अधिक चांगले जग असते’ या विचारसरणीतून फेडएक्सची स्थापना करण्यात आली होती. इन्व्हेस्ट इंडियाशी सहयोग करून स्थानिक उत्पादकांपुढील आव्हानांचे निराकरण करण्याचा आमचा हेतू आहे. आम्ही त्यांना जागतिक लॉजिस्टिक्स सुलभ करण्यासाठी त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी उपाययोजना प्रदान करू. आम्ही एकत्र मिळून निर्यातीला आणि शाश्वत आर्थिक वृद्धीला चालना देत आहोत.”
या सहयोगाद्वारे फेडएक्स आपल्या जागतिक नेटवर्कचा आणि लॉजिस्टिक्समधील कौशल्याचा उपयोग छोट्या आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची पोहोच मिळवण्यास सक्षम बनवण्यासाठी आणि शिपिंग प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी करेल. इन्व्हेस्ट इंडियाच्या सहयोगाने वेबिनार, कार्यशाळा घेऊन तसेच काही प्रत्यक्ष इव्हेंट योजून कारागिरांसाठी ब्रॅंडची पोहोच वाढविण्याचा आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याचा आणि त्यायोगे भारताच्या विविध जिल्ह्यांमधील अनोखी उत्पादने आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसमोर सादर करण्यासाठी एसएमईना सक्षम बनवण्याचा फेडएक्सचा हेतू आहे. इन्व्हेस्ट इंडियाशी सहयोग करून फेडएक्स वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट क्लस्टर्सना आपल्या एसएमई कनेक्ट मंचावर एकत्रित करेल आणि छोट्या व्यवसायांसाठी ज्ञान सामाईक करण्याला तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाला प्रोत्साहन देईल.
इन्व्हेस्ट इंडियाचे एमडी आणि सीईओ निवृत्ती राय म्हणाले, “७५०+ जिल्ह्यांमधील १२०० पेक्षा जास्त अनोख्या देशी उत्पादनांचा जागतिक स्तरावर प्रचार करण्यासाठी आणि ‘व्होकल फॉर लोकल’ चळवळ पुढे नेण्यासाठी वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट उपक्रम वचनबद्ध आहे. या कामी फेडएक्सशी सहयोग करताना आम्हाला आनंद होत आहे. यामध्ये २२०+ देशांमध्ये आणि प्रांतांमध्ये फेडएक्सची उपस्थिती असल्याचा फायदा घेऊन तेथे देशी व्यवसायांना जागतिक मार्केटची पोहोच उपलब्ध करून देणे आणि निर्यात वाढवण्यासाठी वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टमध्ये नोंदण्यात आलेल्या स्थानिक उत्पादकांना पॅकेजिंग, शिपिंग, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि इतर पैलूंबाबतच्या उत्तम प्रथांचे प्रशिक्षण देणे सामील आहे.”