Mumbai : पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरु केल्या आहेत. पेट्रोल -डिझेल जीएसटीच्या कक्षेत आलं तर दर कमी होतील अशी आशा सर्वसामान्यांना आहे. याबाबत फामपेडाचे अध्यक्ष (फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन) उदय लोध यांना विचारलं असता, त्यांनी सांगितलं की, पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले तर त्याचा फायदा सर्व सामान्यांना होईल की नाही हे आत्ताच सांगणे कठिण आहे, नव्याने येणारी कर रचना कशी असेल यावर इंधनाचे दर अवलंबून असतील, असं लोध यांनी यावेळी सांगितलं. तसेच एक कर एक दर झालं तर दरात समानता येईल, त्यासाठी कराचा दर एकसारखाच करावा लागेल. ते जर झालं तर वेगवेगळ्या स्तरावर त्याचे फायदे असल्याचं लोध यांनी यावेळी सांगितले.














