
मुंबई : दिवाळीनिमित्त खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रवाशी वीर कोतवाल उद्यान – प्लाझा, दादर वांद्रे, महात्मा फुले मार्केट, काळबादेवी,ए.पी.एम.सी. मार्केट, वाशी इत्यादी ठिकाणी प्रवास करतात. या प्रवाशांच्या सोयीसाठी दिनांक ३१/१०/२०१८ ते ०५/११/२०१८ या कालावधीत १८ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
तसेच शुक्रवार दिनांक ०९/११/२०१८ रोजी भाऊबीजनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई शहर ,पूर्व- पश्चिम उपनगरे, मीरारोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे),रेतीबंदर- कळवा तसेच वाशी, नवी मुंबई,कोपरखैराणे, नेरुळ,ऐरोली,घणसोली गांव, सीबीडी बेलापूर इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या विविध बसमार्गावर एकूण १३६ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या मदतीसाठी जास्त गर्दी असणाऱ्या बसथांब्यावर तसेच रेल्वे स्थानकाबाहेरील बस्थानकावर बसनिरीक्षकांची तसेच वाहतूक अधिकार्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. बसप्रवाशानी जादा बसगाड्यांची नोंद घेऊन ,उपलब्ध केलेल्या बससेवेचा जास्तीत- जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्टने केले आहे.